स्थानिक कलाकार, उत्पादकांसाठी रेल्वेकडून गुड न्यूज! पुणे स्थानकावर

Pune Railway Station
Pune Railway StationTendernama

पुणे (Pune) : स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, कलाकारांच्या कलेला वाव मिळावा या हेतूने रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) देशभरातील निवडक ७५० रेल्वे स्थानकांवर ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ (One Station One Product - एक स्थानक, एक उत्पादन) हा उपक्रम राबवित आहे. यात पुणे स्थानकाचा (Pune Railway Station) देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे प्रशासन नाममात्र दरात म्हणजे दोन हजारात भाडे तत्वावर हा स्टॉल उपलब्ध करून देत आहे. ऑक्टोबर पासून हे स्टॉल ग्राहकांच्या सेवेत येतील.

Pune Railway Station
जाऊ तिथे खाऊ : अधिकारी-ठेकेदारांना बाप्पा पावला, पॅचवर्क निकृष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम असून रेल्वे मंत्रालय यासाठी विशेष परिश्रम घेत आहे. सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून हा उपक्रम देशभरातील ७५० स्थानकांवर राबविला जात आहे. यासाठी वेगळ्या पद्धतीची स्टॉल तयार केले जात आहेत. स्टॉल धारकांना केवळ त्यांच्या उत्पादनाची स्थानकावर विक्री करायची आहे. तसेच स्टॉलचे लाईट बिल भरावे लागेल.
कोल्हापूर, मिरज, सांगली, जयसिगपूर, हातकणंगले, सातारा, शिवाजीनगर, खडकी, पिंपरी,चिंचवड आदी स्थानकांवर यासाठीचे आयते स्टॉल असणार आहेत. मध्य रेल्वेच्या काही निवडक स्थानकांवर देखील अशा पद्धतीचे स्टॉल उपलब्ध असतील.

Pune Railway Station
आदिवासी विभागाचे 'ते' 113 कोटींचे टेंडर कुणासाठी केले फ्रेम?

स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतूने ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ ही संकल्पना राबविली जात आहे. ऑक्टोबर महिन्यापासून पुणे स्थानकांवर या अंतर्गत विक्रीस सुरवात होणार आहे. यासाठी खूप कमी भाडे आकारले आहे.
- बी. के. सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com