सिंहगड रोडवासियांनो तुमची आणखी 6 वर्षे जाणार कोंडीतच, कारण...

Traffic Jam
Traffic JamTendernama

पुणे (Pune) : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिंहगड रस्त्यावर (Sinhgad Road) उड्डाणपूल (Flyover) बांधला जाणार आहे, याचे काम २०२५ मध्ये पूर्ण होणार असले तरी त्याचवेळी मेट्रोचे (Metro) काम सुरू होणार असून, हे काम संपवण्यासाठी किमान २०२८ वर्ष उलटणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट मोकळी करून घेण्यासाठी पुढील सहा वर्षे तरी या भागातील रहिवाशांना वाट पहावी लागणार आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Traffic Jam
डॉ. खेमणार कारवाई कराच; ठेकेदार धार्जिणे 'ते' 5 अधिकारी कोण?

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलासंदर्भात महापालिकेतर्फे बुधवारी (ता. २४) सादरीकरण करण्यात आले. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते. यावेळी बोनाला यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.

Traffic Jam
कन्नड : औट्रम घाटात रुंदीकरणाचा 'घाट'; बोगद्याच्या कामाला ब्रेक

सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाइम थिएटर पर्यंत उड्डाणपूल बांधला जाणार आहे. यासाठी ११८ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उड्डाणपुलाच्या कामाची सुरवात झाली. आत्तापर्यंत ७२ पैकी ३६ पिलर उभे राहिले आहेत. एकूण २० टक्के काम पूर्ण झाले आहे. राजाराम पूलाकडून धायरीकडे जाणारा उड्डाणपूल फनटाइम थिएटरपर्यंत सलग आहे. तर धायरीकडून स्वारगेटकडे जाताना दोन उड्डाणपूल असणार आहेत. एक उड्डाणपूल शिवा काशीद चौकापासून सुरू होऊन तो इनामदार चौकाच्या अलीकडे उतरणार आहे. तर दुसरा पूल राजाराम पुलाच्या सिग्नलच्या अलीकडे सुरू होऊन स्वारगेटच्या दिशेने शारदा मठाच्या जवळ उतरणार आहे. सध्या प्रामुख्याने हिंगणे चौक आणि माणिक बाग भागात काम सुरू आहे.

Traffic Jam
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डमुळे नाशकातील ६ तालुक्यांतील शेतकरी मालामाल

महामेट्रोने महापालिकेला सादर केलेल्या मेट्रोच्या DPR मध्ये सर्व परवानग्या वेळेत मिळाल्या तर २०२४ मध्ये मेट्रोचे काम सुरू होईल व २०२८ मध्ये काम संपेल. जर परवानग्यांना विलंब झाल्यास त्यास आणखी उशीर होऊ शकतो. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर कमीत कमी ६ वर्षे तरी नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Traffic Jam
'त्या' 8 ठेकेदारांना नाशिक महापालिकेचा दणका; 6 कोटींच्या बिलातून..

उड्डाणपुलावर दोन स्टेशन
महामेट्रोने नुकताच पुणे महापालिकेला खडकवासला ते स्वारगेट या मार्गाचा मेट्रोचा डीपीआर सादर केला आहे. त्यामध्ये उड्डाणपुलाच्या वर हिंगणे आणि शिवा काशीद चौक या दोन ठिकाणी मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहेत. या स्टेशनची उंची उड्डाणपुलाच्यावर साडेपाच मीटर इतकी असणार आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मेट्रोचे काम करताना मात्र या भागातील नागरिकांना रस्ता कमी होणे, पादचारी मार्ग नसणे अशा अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Traffic Jam
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डमुळे नाशकातील ६ तालुक्यांतील शेतकरी मालामाल

पुलाच्या मध्यभागी मेट्रोचे १०५ पिलर
राजाराम पूल ते फनटाइम या दरम्यान मेट्रोचे काम करताना १०५ पिलर उभारले जाणार आहेत. त्यासाठी उड्डाणपुलाच्या मध्यभागी पिलरसाठी आवश्‍यक असलेला भाग मशिनने कट केला जाणार आहे. हे काम सुरू असताना उड्डाणपुलावर मध्यभागी पाच मीटर रस्ता बॅरिकेटिंग करून बंद केला जाणार आहे. तर दोन्ही बाजूने प्रत्येकी साडेपाच मीटर रस्ता उड्डाणपुलावर सुरू राहील. त्यामुळे मेट्रोचे काम करताना उड्डाणपुलाखाली व उड्डाणपुलाच्यावर वाहतूक मंद होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com