गुड न्यूज! पुण्याच्या चोहोबाजुने असे विस्तारणार मेट्रोचे जाळे...

Pune Metro
Pune MetroTendernama

पुणे (Pune) : पुणे शहरातील सहा विस्तारित एलिव्हेटेड मेट्रो मार्गांचे सुमारे ४५ किलोमीटरचे प्रकल्प अहवाल महामेट्रोने महापालिकेला नुकतेच सादर केले आहेत. स्वारगेट-हडपसर मार्गाच्याही अहवालाचा त्यात समावेश आहे. या मार्गांसाठी सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच शहरातील उच्च क्षमता द्रुतगती बाह्यवर्तुळाकार मार्गाचा (एचसीएमटीआर) प्रकल्प अहवाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस महापालिकेला सादर होणार आहे. यामुळे शहरातील मेट्रोचे जाळे विस्तारित होण्यासाठीचे पहिले पाऊल पडले आहे. (Pune Metro)

Pune Metro
कोरोनानंतर वेगाने बदलताहेत नागरिकांच्या आवडी-निवडी; कारण...

स्वारगेट-हडपसर मार्गासाठी ‘पीएमआरडीए’नेही प्रकल्प अहवाल तयार करून राज्य सरकारला सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर महामेट्रोनेही या मार्गाचा प्रकल्प अहवाल महापालिकेला सादर केला आहे. स्वारगेट-हडपसर मेट्रो मार्गासाठी कोणता प्रकल्प अहवाल अंतिम करायचा, याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. पीएमआरडीए आणि महामेट्रोचे मेट्रो तंत्रज्ञान वेगवेगळे आहे. स्वारगेट-हडपसर मेट्रो पुढे खराडी, वाघोलीला जोडण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे या बाबतचा अंतिम निर्णय आणि अन्य प्रकल्पांवर अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. त्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर काम सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, महासंचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते. दरम्यान, ‘एचसीएमटीआर’चा ३६ किलोमीटरच्या मेट्रो निओचा प्रकल्प अहवाल ऑगस्टअखेरीस महापालिकेला सादर होणार आहे.

Pune Metro
अखेर औरंगाबाद खंडपीठासमोर नमले प्रशासनातील दुशासन; मोठा अडथळा दूर

एक रेक पुण्यात दाखल
पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी-दापोडी दरम्यान मेट्रोची चाचणी नुकतीच यशस्वी झाली. आता पुढच्या टप्प्यात दापोडी ते रेंजहिल्स दरम्यानच्या मेट्रो मार्गावर चाचणी होईल. त्यासाठी मेट्रोचे तीन डबे गुरुवारी कोलकत्त्यावरून पुण्यात आले आहेत. त्यांची जोडणी झाल्यावर मेट्रो मार्गावर त्यांची चाचणी होईल. हे डबे देशात तयार झाले आहेत. त्यामुळे तीन डब्यांच्या सात गाड्या पुण्यात झाल्या आहेत. दर महिन्याला ३ रेक (तीन डब्यांची एक गाडी) पुण्यात येतील. एकूण ३४ रेक पुणे-पिंपरीमध्ये धावणार आहे, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले.

Pune Metro
चौपदरीकरणानंतरही पुणे-नाशिक प्रवासाला का लागताहेत ६ तास?

मेट्रो पूर्ण करणार २५ किलोमीटरचा टप्पा
पुणे शहरातील वनाज ते शिवाजीनगर न्यायालय मार्गाचे काम जसे पूर्ण होईल, तशा चाचण्या आता सुरू होतील. तसेच फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय मार्गावरही त्याच दरम्यान चाचण्या होतील. ३१ ऑक्टोबरपर्यंत या दोन्ही मार्गांचे काम पूर्ण होईल. त्यामुळे प्रवाशांसाठी मेट्रो मार्गांची वाढ होईल. रेंजहिल्स ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर विस्तारित मार्गांचे काम सुरू होईल, असेही दीक्षित यांनी नमूद केले.

Pune Metro
मुंबई : रस्त्यांच्या ५८०० कोटींच्या टेंडरसाठी २५ कंपन्यांत स्पर्धा

असे असतील विस्तारित मार्ग
- वनाज-चांदणी चौक - १.१२ किलोमीटर - २ स्थानके
- रामवाडी-वाघोली - ११.६३ किलोमीटर - ११ स्थानके (दोन्ही प्रकल्पांचा खर्च - ३३५७. ८० कोटी रुपये )
- खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी - २५. ६५ किलोमीटर - २२ स्थानके
- एसएनडीटी-वारजे-माणिकबाग - ६. ११८ किलोमीटर - ६ (दोन्ही प्रकल्पांचा खर्च - ८६५८. ०९ कोटी रुपये)
- एकूण विस्तारित मेट्रो मार्ग - ४४. ५१८ किलोमीटर - स्थानके : ४१ - संभाव्य प्रकल्प खर्च - १२०१५ . ८९ कोटी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com