'त्या' जमिनी मालकी हक्काने करून देण्यास PMRDAकडून सुरवात

Land Ownership
Land OwnershipTendernama

पुणे (Pune) : म्हाळुंगे - माण नगर रचना योजनेतील (Mhalunge-Man TP Scheme) ४६ एकर वर्ग दोनची जमीन मालकी हक्काने करून देण्याची प्रक्रिया पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) सुरू केली आहे. ४६ एकर जमिनीचे ५० हून अधिक खातेदार असून, त्यांनी नजराणा भरल्यानंतर ही जमिनी त्यांना मालकी हक्काने मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. प्रथमच अशा प्रकारे शासनाच्या मालकी हक्काच्या जमिनी विविध संस्था, तसेच वतनाने दिलेल्यांना एकत्रितपणे मालकी हक्काने करून देण्याचा प्रयत्न होणार आहे.

Land Ownership
या भागाच्या कनेक्टिव्हिटीसाठी बीएमसी उभारणार २१८ कोटींचा केबल पूल

पीएमआरडीएकडून चार वर्षांपूर्वी म्हाळुंगे-माण येथील २५० एकर जागेवर टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१८ मध्ये राज्य सरकारकडून या टीपी स्कीमला मान्यता देण्यात आली. या योजनेचे काम पूर्वी एल ॲण्ड टी कंपनीला देण्यात आली होते. मात्र कोरोनाच्या काळात या कंपनीकडून कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे हे काम काढून घेण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला. त्यानंतर खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्यासही प्राधिकरणाची कार्यकारी समिती आणि प्राधिकरण सभा यांनी नकार दिला. त्यामुळे प्राधिकरणाने स्वतः ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी पीएमआरडीएकडून १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Land Ownership
मुद्रांक शुल्कावरील दंडात आता ५० टक्के सवलत; पण मुदत फक्त...

या योजनेतील सुमारे अडीचशे हेक्टर जागेपैकी ४५ एकर जागा ‘वर्ग दोन’ची आहे. या जमिनी राज्य सरकारकडून काही अटी व शर्तींवर विविध संस्था व वतनांना देण्यात आल्या आहेत. अशा जमिनीवर अद्यापही शासनाचा मालकी हक्क आहे. या जमिनी मालकी हक्काने करून द्यावयाच्या असेल, तर त्या पोटी संबंधितांना जमिनींच्या एकूण मूल्याच्या पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारकडे नजराणा म्हणून भरावी लागते. ही रक्कम भरल्यानंतर जमीन वर्ग १ ची (मालकी हक्काची) होते. हे लक्षात घेऊन पीएमआरडीएने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या जमिनी मालकी हक्काने करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच एक भाग म्हणून या सर्व जमीन मालकांचे नुकतेच एक शिबिर घेण्यात आले.

Land Ownership
नवी मुंबई एयरपोर्ट परिसरात बांधकाम उंचीची मर्यादा तिप्पट; आता...

वतनाच्या या जमिनी मालकी हक्काने करून देण्यासाठी सर्व प्रक्रिया प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. त्या पोटी भरावा लागणारा नजराणा मात्र जागा मालकांना भरावा लागणार आहे. तो भरल्यानंतर ती जमिनीचे रूपांतर ‘वर्ग एक’मध्ये होणार आहे. त्यानंतर त्यांना पर्यायी जमिनींचे वाटप करणे सोपे होणार आहे, असे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Land Ownership
पुणे : समाविष्ट २३ गावांपैकी 'या' गावात जलवाहिन्यांसाठी प्रक्रिया

म्हाळुंगे-माण टीपी स्कीम योजनेची ‘वर्ग दोन’च्या जमिनी ‘वर्ग एक’मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या मदतीने पीएमआरडीएकडून सुरू करण्यात आली आहे. नुकतेच अशा जागा मालकांसाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित जागा मालकांनी नजराणा भरल्यानंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा नगर रचना योजना समन्वयक, पीएमआरडीए

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com