टोल भरून करा 'या' मृत्यूच्या महामार्गावरून प्रवास; ब्लॅकस्पॉटमुळे

Pune-Satara Highway
Pune-Satara HighwayTendernama

सातारा (Satara) : सध्या शेंद्रे ते कागल (Shendre To Kagal) या महामार्गावरील ब्लॅक स्पॉटच्या (Black Spots) ठिकाणी उड्डाणपूल (Flyover) बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण, सातारा-पुणे या सहापदरी महामार्गावरील (Pune - Satara Six Lane Highway) ब्लॅक स्पॉट काढण्याचे काम कधी हाती घेतले जाणार, असा प्रश्न संतप्त वाहनचालकांतून उपस्थित होत आहे. दरम्यान, येत्या डिसेंबरमध्ये सातारा-कागल या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pune-Satara Highway
EXCLUSIVE : फडणवीसांच्या खात्यात भ्रष्टाचाराचे टोक;टक्केवारीसाठी..

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर ३२ ठिकाणी अपघात होणारी ठिकाणे आहेत. यामध्ये पुणे-सातारा महामार्गावर सर्वाधिक ब्लॅक स्पॉट आहेत. तर सातारा-कागल या महामार्गावर पाच ठिकाणी ब्लॅक स्पॉट होते. त्याची सुधारणा करण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाल्याने सध्या सातारा ते कागल मार्गावर मसूर फाटा, इंदोली फाटा येथे उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. पण, सातारा-पुणे महामार्गावर सर्वाधिक ब्लॅक स्पॉट असून, तेथील दुरुस्ती व सुधारणा करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. केवळ खंबाटकी बोगद्यातील वळण काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे येथील सर्वांत धोकादायक वळण काढले जाऊन दोन स्वतंत्र बोगदेही होणार आहेत. पण, उर्वरित ठिकाणी असलेल्या ब्लॅक स्पॉटच्या कामांकडे मात्र, महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

Pune-Satara Highway
महाराष्ट्रातील नॅशनल हायवे का बनलेत मृत्यूचे सापळे?

दरम्यान, येत्या डिसेंबरमध्ये सातारा ते कागल या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू होणार आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. पण, सहापदरीकरण होत असताना काही ठिकाणी असलेल्‍या धोकादायक क्रॉसिंगच्या ठिकाणीही उड्डाणपुलांची कामे करावीत. तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारचे सेवारस्ते व्हावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com