साताऱ्यात दोन्ही 'राजां'च्या समर्थकांत नेमकी चढाओढ कशासाठी?

साताऱ्यात दोन्ही 'राजां'च्या समर्थकांत नेमकी चढाओढ कशासाठी?

सातारा (Satara) : साताऱ्यातील (Satara) हुतात्मा स्मारकात होणाऱ्या हुतात्मा कर्नल संतोष महाडिक (Santosh Mahadik) स्मृती उद्यानाच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत पाच जणांनी हे टेंडर भरले आहे. टेंडरची दर निश्चिती करून ते अंतिम केले जाणार आहे. टेंडर मिळविण्यासाठी दोन्ही 'राजां'च्या समर्थकांत चढाओढ लागली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिलमध्ये प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

साताऱ्यात दोन्ही 'राजां'च्या समर्थकांत नेमकी चढाओढ कशासाठी?
पुणे, पिंपरीच्या वाहतूक प्रश्नावर अजितदादांचा रामबाण उपाय

काश्मिरात कुपवाडा येथे १७ नोव्हेंबर २०१७ मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत साताऱ्याचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक हुतात्मा झाले होते. ते '४१ राष्ट्रीय रायफल्स'मध्ये कार्यरत होते. त्यांचे शिक्षण सातारा सैनिक स्कूलमध्ये झाले होते. या साताऱ्याच्या सुपुत्राच्या आठवणी तरूण पिढीस कायम प्रेरणा देत राहव्यात, या हेतूने सातारा पालिकेने हुतात्मा कर्नल संतोष महाडिक स्मारक उभारण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. त्यासाठी पालिकेने ५० लाखांची तरतूद केली होती. पण, जागेचा प्रश्न आणि स्मारकासाठी असलेली नियमावली, यामुळे त्यात थोडा बदल करण्यात आला. त्यानुसार हुतात्मा कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी हुतात्मा स्मारकातील ११ ते १२ गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

साताऱ्यात दोन्ही 'राजां'च्या समर्थकांत नेमकी चढाओढ कशासाठी?
IMPACT : अखेर पुणे-सातारा महामार्गावरील रिलायन्सचा ठेका रद्द

या स्मृती उद्यानासाठी माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी तत्कालिन पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली, आंदोलनेही केली होती. त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले आहे. या स्मारकास जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी ३२ लाख रुपयांचा निधी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे उपलब्ध झाला आहे.

साताऱ्यात दोन्ही 'राजां'च्या समर्थकांत नेमकी चढाओढ कशासाठी?
पुणे–सातारा रस्त्यावर रिलायन्सकडून २ हजार कोटींची बेकायदा टोलवसुली

आता या स्मृती उद्यानाच्या बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. सध्या तांत्रिकदृष्ट्या हे टेंडर ओपन झाले असून, आतापर्यंत पाच जणांनी हे टेंडर भरले आहे. आता या कामाच्या दर निश्चितीचे टेंडर ओपन होणार आहे. त्यामुळे येत्या २२ मार्चपर्यंत कमी दराचे टेंडर अंतिम करून एप्रिलमध्ये स्मृती उद्यानाचे काम सुरू होणार आहे. पण सध्या पाच जणांनी टेंडर भरले असून, आपल्याच समर्थकाला किंवा समर्थकाच्या जवळच्या कंपनी किंवा संस्थेला टेंडर मिळावे, यासाठी दोन्ही 'राजां'च्या समर्थकांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हे टेंडर कोणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com