एमएमआरडीए इन ऍक्शन; कल्याणसाठी ११ हजार कोटींचे रस्ते

MMRDA
MMRDATendernama

मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मिशन मोडवर सक्रीय झाले आहे. खासदार डॉ. शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील रस्ते चकाचक करण्यासाठी ११ हजार कोटींच्या कामाचे नियोजन केले आहे.

MMRDA
ई-व्हेईकल, पर्यटन प्रकल्पांसाठी राज्य सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

एमएमआरडीएने या प्रकल्पांसाठी सुसाध्यता अहवाल तयार करण्याच्या एका प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिघातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करत असताना कल्याण, डोंबिवली, शिळफाटा या भागातही मोठया वाहतूक प्रकल्पांची आखणी केल्याशिवाय पर्याय नसल्याची स्पष्ट मांडणी एमएमआरडीएने केली आहे. त्यामुळेच आगामी काळात ऐरोली नाका ते काटई नाका रोड, शिळफाटा ते माणकोली, कल्याण ते माणकोली (बापगाव), कल्याण-एनआरसी- टिटवाळा अशा मोठ्या वाहतूक प्रकल्पांची आखणी एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे. यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, शिळफाटा, कल्याण, डोंबिवली या शहरांचा चेहरामोहरा बदलणार आहे.

MMRDA
6 हजार कोटींचे 'ते' टेंडर रद्द करण्याची बीएमसीवर नामुष्की

प्रमुख रस्त्यांची कामे -
* टिटवाळा-पडघा रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण
* नवी मुंबईतील महापे ते दहीसरदरम्यान दोन स्वतंत्र बोगदे
* दहीसर गाव ते मुरबाडदरम्यान नवा रस्ता
* टिटवाळा ते बदलापूरदरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण
* खारेगाव ते पडघा या रस्त्याचे काँक्रीटीकरण
* कल्याण-एनआरसी-टिटवाळा दरम्यान तीन ते चार पदरी रस्त्याचे कॉक्रिटीकरण
* कल्याण ते माणकोली (बापगाव), शीळफाटा ते माणकोली, ऐरोली बोगदा ते काटई नाका वाहतूक प्रकल्प. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com