मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर घडणार इतिहास; देशातील सर्वांत उंच...

Cable Stayed Bridge
Cable Stayed BridgeTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे (Mumbai-Pune Expressway) वर भारतातील सर्वात उंच केबल स्टेड ब्रीज (Cable-Stayed Bridge) साकारत आहे. या 132 मीटर उंच पुलाचे बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे. केबल स्टेड पुलाची लांबी जवळपास 650 मीटर लांब आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीची अफकॉन्स ही कंपनी हे काम करते आहे.

Cable Stayed Bridge
अखेर शिंदे सरकारने राज्यातील कामांवरील उठवली स्थगिती

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्प दोन पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. यातील पॅकेज दोनचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये सध्याच्या द्रुतगती मार्गाचे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण होईल. शिवाय दोन उड्डाणपूल होतील. त्यापैकी एका ब्रीजमध्ये केबल-स्टेड ब्रिजसह इतर कामांचा समावेश आहे. यातील सुमारे 850 मीटर लांबीच्या व्हायाडक्ट-१ साठी फाउंडेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर प्री-टेन्शन गर्डर्स आणि डेक पॅनेलचे लॉन्चिंग प्रगतीपथावर आहे. केबल-स्टेड पुलाची लांबी जवळपास 650 मीटर लांब आहे. तर हा पूल जमिनीपासून 132 मीटर उंचीवर असेल, जो देशातील इतर रस्ते प्रकल्पामधील सर्वात उंच पूल असेल.

Cable Stayed Bridge
मंत्रालयात मोठा खांदेपालट; वल्सा नायर सिंह यांच्याकडे हौसिंग, तर..

या केबल स्टेड रोड ब्रीजमुळे मुंबई पुणे या दोन शहरांमधील अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घाट विभागाला बायपास करेल. मुंबई - पुणे द्रुतगती मार्गाची खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतची लांबी 19 किलोमीटर आहे. या ब्रीजचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवास जवळपास 25 मिनिटांनी कमी होणार आहे.
अफकॉन्स कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक रणजीत झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या व्हायाडक्ट टूमध्ये फाउंडेशन, पिलर आणि पायलॉन (केबल स्टेड ब्रीज पिलर) बांधण्याचे काम सुरू आहे. या व्हायाडक्टमधील सर्वात उंच पायलॉन जमिनीच्या पातळीपासून 182 मीटर असेल.
या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती रणजीत झा यांनी दिली आहे. खंडाळा घाट हा भूस्खलन आणि अपघातप्रवण भाग आहे. नवीन लिंकमुळे अपघात कमी होण्यासोबतच इंधन कार्यक्षमता सुधारण्यास आणि वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पॅकेज टूचे काम 2019 मध्ये सुरू झाले असून हे काम 2024 मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती झा यांनी दिली आहे.

Cable Stayed Bridge
सिन्नर माळेगाव एमआयडीसीत 40 एकर जमीन घोटाळा; कोणी केली तक्रार?

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भारतातील सर्वात उंच केबल -स्टेड ब्रीज उभारला जाणार आहे. परंतु, हा ब्रीज पूर्ण होण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी विविध भूवैज्ञानिक, वाहतूक आणि अत्यंत अभियांत्रिकी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. सध्याच्या एक्स्प्रेस वेचे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण करण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये टेकडी तोडण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागते. या ब्लास्टिंग दरम्यान केवळ वाहतूकच नाही तर ब्लास्टिंग ठिकाणांजवळील काम देखील थांबवले जाते. शिवाय मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री ब्लास्टिंग प्रभाव क्षेत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलवली जाते. द्रुतगती मार्गावरील अवजड वाहतुकीदरम्यान सामग्रीची वाहतूक आणि गर्डरचे स्थलांतर ही सुद्धा टीमसमोरील इतर काही आव्हाने आहेत.
पॅकेज अंतर्गत सध्याच्या द्रुतगती मार्गाचे 5.86 किमी रुंदीकरण होईल. 10.2 किमी रस्त्यांचे बांधकाम होईल. याबरोबरच 132 मीटर उंच केबल-स्टेड ब्रीजच्या बांधकामासह केबल-स्टेड ब्रिजमध्ये 182M उंचीचा सर्वात उंच पायलॉन असेल. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com