'या' निर्णयामुळे वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाला वेग

Railway Track
Railway TrackTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाला वेग देण्यासाठी १ हजार ९६ कोटी इतक्या द्वितीय सुधारित खर्चास आणि राज्य शासनाच्या ५० टक्के आर्थिक सहभागास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार ५४८ कोटी राज्य शासनाच्या वाट्याचे असतील. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. (Vadsa Desaiganj - Gadchiroli Railway Track)

Railway Track
नाशिकमध्ये २०५१ पर्यंतचा विचार करून पाणी पुरवठ्याचा मास्टरप्लॅन

सध्या या रेल्वे मार्गाची केवळ ७ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. २०१० या वर्षी प्रकल्पाची किंमत २०० कोटी होती, २०१५ या वर्षी ती ४६९ कोटी झाली. प्रकल्प खर्चात विविध कारणांमुळे वाढ झाली.

Railway Track
शिंदे-फडणवीस सरकारला उपरती; 'या' फायली तातडीने पाठवल्या परत

या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा मोबदला त्वरित द्यावा तसेच वन विभागाशी संबंधित मुद्दे तातडीने मार्गी लावावेत असे निर्देशही मंत्रिमंडळाने परिवहन विभागास दिले. ३१ मार्च २०२२ पर्यंत केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी २९ कोटी २२ लाख निधी दिला असून राज्य सरकारने १९ कोटी २२ लाख इतका निधी दिला आहे.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com