शिंदे-फडणवीसांना गुजरातने चुना लावला; 'हा' मोठा प्रकल्पही पळवला

Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रात (Maharashtra) येऊ घातलेला सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट आता गुजरातने (Gujrat) पळवला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात २ लाख रोजगार निर्मिती झाली असती. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून बोलणी सुरू होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच आता वेदांता सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Vedanta - Foxconn Semiconductor Project - Devendra Fadnavis, Eknath Shinde)

Devendra Fadnavis Eknath Shinde
नाशिक जिल्ह्यातील 'ही' योजना मार्गी; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प हा महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडीने (MVA) मजबुतीने प्रयत्न केले होते. पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे आणि तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी अनेक बैठका घेत, भेटीगाठी केल्या होत्या. पुण्याजवळ हा प्रकल्प येणार, असे जवळपास निश्चित झाले होते. मधल्या काळात एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी राज्यात सरकार स्थापन केले आणि मविआच्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ बसली. आता हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde
नागपूरमधील हे पोलिस ठाणे झाले स्मार्ट;पुन्हा भाजप सत्तेत आल्याने..

ऑटो आणि स्मार्टफोन इंडस्ट्रीसह अत्याधुनिक उपकरणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सेमीकंडक्टर निर्मितीचा भारतात तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातच सेमीकंडक्टर उत्पादनासाठी प्रयत्न सुरू होते. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न सुरू होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात तैवानमधील फॉक्सकॉन आणि खनिकर्म क्षेत्रातील वेदांता या कंपन्यासोबत चर्चा सुरू झाली होती.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही फॉक्सकॉन आणि वेदांता कंपन्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली होती. एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ट्विटर हॅण्डलवर या बैठकीसंदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. २६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तैवानमधील फॉक्सकॉन आणि भारतीय वेदांता कंपनीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब उत्पादन निर्मिती प्रकल्प पुण्यात उभारण्यासंदर्भात ही चर्चा झाली होती. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात २ लाख रोजगार निर्मिती झाली असती.

Devendra Fadnavis Eknath Shinde
'अदानी'च्या मुंबईतील ७ हजार कोटींच्या 'या' प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रोजेक्टची उभारणी वेदांता समूह करणार आहे. याबद्दलची माहिती वेदांता समुहाचे चेअरमन अनिल अगरवाल यांनी ट्विट करून दिली. फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारणार असून यामुळे आत्मनिर्भर सिलीकॉन व्हॅलीचे स्वप्न साकारण्यास मदत होणार आहे. भारताची सिलीकॉन व्हॅली आता एक पाऊल दूर आहे, असे अनिल अगरवाल यांनी म्हटले आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो.'

Devendra Fadnavis Eknath Shinde
नवी मुंबई मेट्रोकडून गुड न्यूज! बेलापूर ते तळोजा मार्गिकेचे...

खोके सरकारवर विश्वास नाही

आदित्य ठाकरेंनी पुढे म्हटले आहे की, 'हा प्रोजेक्ट इतर राज्यात गेला त्याचे दुःख नाही, पण आपल्या राज्यात का आला नाही, याचे आश्चर्य आहे. ज्या प्रोजेक्टवर एवढे काम करून मविआ सरकारने एवढे पाठबळ देऊनही हा प्रोजेक्ट तिथे जाणे, याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणुकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही.'

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com