238 नव्या एसी लोकल येण्याआधी होणार सर्वेक्षण; सल्लागारासाठी टेंडर

AC local train
AC local trainTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर लवकरच 238 नव्या एसी लोकल येणार आहेत. या लोकल खरेदी करण्यापूर्वी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये हे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी लवकरच सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे.

AC local train
शिंदे सरकारची १ लाख कोटींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी

सध्या मध्य रेल्वेवर 56 तर पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 48 फेर्‍या चालविण्यात येतात. एसी लोकलचे तिकिट दर कमी केल्यापासून गर्दी वाढली असली तरी साध्या लोकल रद्द करून एसी लोकल चालविण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. कळवा, बदलापूर येथील प्रवाशांनी एसी लोकलला कडाडून विरोध केल्याने मध्य रेल्वेने एसी लोकलच्या 10 फेर्‍या रद्द केल्या आहेत. एमयुटीपी ३ अंतर्गत 191 तर एमयुटीपी ३ ए मध्ये 47 अशा एकूण 238 एसी लोकल लवकरच उपनगरीय रेल्वे मार्गावर येणार आहेत. प्रवासी आताच एसी लोकलला विरोध करीत असल्याने एसी लोकलची खरेदी करण्यापूर्वी सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे.

AC local train
'या' भयंकर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे झेडपीचे टेंडर

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये हे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. त्यांना एसी लोकल कशी हवी, तिकिट-पासाचे दर कसे हवे असे अनेक प्रश्न विचारण्यात येणार आहेत. हे सर्व्हेक्षण करण्यासाठी एमआरव्हीसी एका खासगी सल्लागार कंपनीची नियुक्ती करणार आहे. त्याकरिता प्रस्ताव मागविण्यात आले आहे. नियुक्ती केल्यानंतर संबंधित कंपनीने सहा महिन्यांत एमआरव्हीसीला अहवाल सादर करायचा आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत सल्लागार कंपनीची नियुक्ती होण्याची अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com