ऐन महागाईत RBIचा 'दे धक्का'! तुमचा कर्जाचा हप्ता वाढणार, कारण...

RBI Shaktikanta Das
RBI Shaktikanta DasTendernama

मुंबई (Mumbai) : 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी (GDP) 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आरबीआयने याआधीच हा अंदाज वर्तवला होता. सध्या जागतिकीकरण आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव असल्याचे दिसून येत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. देशातील महागाईच्या मुद्यावर चिंता कायम असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी पतधोरण आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो रेट (Repo Rate) वाढवला आहे. यावेळी रेपो दर ५० बेस पॉईंट म्हणजे ०.५० टक्क्याने वाढवला आहे. आता रेपो रेट ५.४० टक्क्यांवर पोहचला आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, वाहन कर्जे महागणार आहेत.

RBI Shaktikanta Das
न्यायालयाचा बिल्डरला दणका! कराराआधीच भूमी अधिग्रहण भोवणार

मान्सून सामान्य राहिल्यास आणि कच्च्या तेलाच्या किंमती 105 डॉलर प्रति बॅरल राहिल्यास चालू आर्थिक वर्षात महागाई दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. सध्या महागाई कमी होताना दिसत आहे. मान्सून सामान्यपेक्षा चांगला होत आहे. त्याचे परिणामही दिसत आहेत. मात्र, पुराचा फटका बसल्यास महागाईत वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात खाद्य तेलाच्या किंमतीही कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्याज दर वाढवल्याने बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. त्यामुळे महागाईला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होते.

RBI Shaktikanta Das
मोठा दिलासा! देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार; लवकरच...

याआधी आरबीआयने मे 2022 मध्ये झालेल्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीनंतर रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के झाला. त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रेपो दर 4.90 टक्के इतका झाला. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.
२०२२-२३ मध्ये महागाई दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे; तर २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत किरकोळ महागाई (सीपीआय) दर ५ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे.
आरबीआयने रेपो दरात वाढ करण्यासह एसडीएफच्या दरात वाढ केली आहे. एसडीएफ दर 5.15 टक्के असणार आहे. याआधी एसडीएफ दर 4.65 टक्के होता.

RBI Shaktikanta Das
शाहगंज घड्याळाची टिकटिक सुरु; हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत...

२०२२-२३ मध्ये GDP वृद्धीचा अंदाज ७.२ टक्के एवढा कायम ठेवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत १६.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे दास यांनी म्हटले आहे.
ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर 5.40 टक्क्यांवर गेला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com