'त्या' 852 शाळांना ZP सीईओ 'उजेडाचा रस्ता' दाखविणार का?

Power Supply
Power SupplyTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : थकीत वीज बिलांमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ८५२ शाळांमधील काळोखावर 'टेंडरनामा'ने प्रकाशझोत टाकला होता. या वृत्ताची दखल घेत शाळांमधील वीजपुरवठा लवकरच पूर्ववत करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. निलेश गटणे यांनी दिली. यासाठी चालू बील भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात सोलार ऊर्जेसाठी शाळांमधून यंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती गटणे यांनी 'टेंडरनामा'ला दिली. (Aurangabad ZP Schools)

Power Supply
औरंगाबाद मनपात प्रशासकांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण?

मागील आठवड्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या एका आढावा बैठकीत त्यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्यासमोर जिल्ह्यातील ८५२ शाळा अंधारात असल्याचा गंभीर प्रश्न उजेडात आणत सभागृहात उपस्थितांचे लक्ष वेधले होते. मुख्य विद्युत वाहिन्यांपासून शाळेचे दूर अंतर असल्याने ज्या शाळांमध्ये वीजपुरवठा नाही यासाठी महावितरणकडे त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यापुढे महावितरण कंपनीने देखील थकीत बिलापोटी शाळांचा वीजपुरवठा खंडीत न करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टिट्यूशनल प्रकारात शाळांना वीजदर लावण्याचा महावितरण कंपनीने देखील निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत सर्व शाळांचा अंधार दूर होईल, अशी ग्वाही डॉ. गटणे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com