औरंगाबादेत 7 वर्षांनंतरही मॉडेल रेल्वे स्थानकाच्या केवळ बाताच...

Aurangabad Railway Station
Aurangabad Railway StationTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : माॅडेल रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन होऊन ७ वर्षे लोटली. मात्र, रेल्वे स्टेशनच्या या महत्त्वाच्या आणि कोट्यवधीचा महसूल मिळवून देणाऱ्या विकासकामांकडे दक्षिण मध्य रेल्वेचे दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे स्टेशनच्या निजामकालीन जुन्या इमारतीतील गळती, सर्दावलेल्या भिंती, जुनाट विद्युत यंत्रणा, पडझड झालेले छत, मोडकळीस आलेल्या दारवाजे-खिडक्यांच्या दुरावस्थेवर 'टेंडरनामा'ने प्रहार करताच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जागे केले. अधिकाऱ्यांनी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाच्या (आरएलडीए) माध्यमातून पुढील टप्प्यांत असलेल्या मीटरगेज कक्षातील एक पत्रा बदलून गळती थांबवण्यासाठी फुटकळ दुरूस्ती सुरू केली.

Aurangabad Railway Station
ठाकरेंच्या निर्णयांना स्थगिती का दिली; न्यायालय म्हणाले शिंदेंना..

अधिकारी म्हणाले तसे काही नाही...

माॅडेल रेल्वेस्थानकाचे रूपडे पालटणार अशी अफवा शहरात पसरताच 'टेंडरनामा'ने दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी राजीव शिंदे, मुख्य जनसंपर्क अधिकारी शकील अहेमद तसेच आरएलडीएचे निरीक्षक मुरली मिश्रा, विभागीय मंडल अभियंता जनार्दन बालमूच यांना संपर्क करत आरएलडीएच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाच्या पुढील टप्प्यांचे काम सुरू झाले काय? अशी विचारणा केली. त्यावर तेच गोंधळात पडले. याबाबत काहीच माहीत नसल्याचे म्हणत ही अफवा असल्याचे ते म्हणाले. यानंतर औरंगाबाद रेल्वे स्थानक प्रबंधक एल. के. जाखडे यांना संपर्क केला असता रेल्वेच्या एका मीटर गेज कक्षातील गळती थांबवण्यासाठी केवळ फुटकळ दुरूस्ती सुरू असल्याची खात्रीदायक माहिती देऊन त्यांनी विषय थांबवला.

Aurangabad Railway Station
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डमुळे नाशकातील ६ तालुक्यांतील शेतकरी मालामाल

२०१४ - १५ मध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पाठपुराव्याने औरंगाबादच्या रेल्वे स्थानकाचा माॅडेल रेल्वे स्थानकात समावेश झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात एका भव्य इमारतीचे बांधकाम होऊन स्थानकाला नवा लूक प्राप्त झाला. त्यानंतर एकीकडे या इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच खैरे यांनी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ३ जुलै २०१५ रोजी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील निजामकालीन लूक असलेल्या जुन्या इमारतीचे बांधकामाचे भूमिपूजन देखील थाटामाटात करण्यात आले होते. मात्र या सोहळ्याला सात वर्षे उलटूनही अद्याप बांधकाम सुरू झालेले नाही.

Aurangabad Railway Station
भुजबळांच्या अपूर्ण मांजरपाडा प्रकल्पास लवकरच..; फडणवीसांचे आश्वासन

रेल्वे राज्यमंत्र्यांची नुस्तीच बैठक

'टेंडरनामा'ने रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या विकास कामांवर प्रश्न उपस्थित केला. त्यात माॅडेल रेल्वे स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या विकास कामांचे भिजत घोंगटे कधी मिटणार, असा सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना वृत्तमालिकेद्वारे करताच त्यांनी २७ जुलै रोजी तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात औरंगाबादसह जालना रेल्वे स्थानकाच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा केली. या कामात हयगय आणि निष्काळजीपणा न करतात तातडीने कामे मार्गी लावा, असे निर्देशही दिले. मात्र कुठल्याही हालचालींना वेग आला नाही.

Aurangabad Railway Station
दिवाळीत म्हाडाच्या ४ हजार घरांसाठी लॉटरी; या भागातील घरांचा समावेश

छतावरील एक पत्रा बदलला म्हणे कायापालट...

रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीलाच लागून पत्र्याचे छत असलेली इमारत आहे. त्यात स्थानकातील मीटर गेज आहेत. पावसाळ्यात गळती लागल्याने केवळ त्यातील एक फुटका पत्रा बदलण्याचे काम आरएलडीएने केले. त्यातूनच गावभर रेल्वे स्थानकाचे रूपडे पालटणार अशी अफवा पसरली.

'टेंडरनामा' प्रतिनिधीने यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता फेब्रुवारी महिन्यात जाहीर केलेल्या रेल्वे बजेटमध्ये औरंगाबाद रेल्वे स्थानकाला पुरेसा निधी मिळाला नाही. निधीची तरतूद नसल्याने आरएलडीए कसा विकास करणार, असा प्रश्न त्यांनीच उपस्थित केला.

Aurangabad Railway Station
अखेर ठरलं! औरंगाबाद-पैठण मार्ग होणार सुसाट; 500 कोटींचे टेंडरही...

रेल्वेच्या अनब्रेक बाता ....

रेल्वेस्टेशनचे रखडलेले पुढील काम कधी आरएलडीए, तर कधी पर्यटन मंत्रालय मंत्रालयाच्या सहकार्याने करून देश-विदेशातील पर्यटकांना नजरेसमोर ठेवून सुविधा अंब्रेला वर्कचे डिझाईन तयार करून सुविधा दिल्या जातील, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात येते. पण पुन्हा प्रश्न उपस्थित केले तर निधीच नसल्याचे म्हणत औरंगाबादकरांची थट्टाच करण्यात येते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com