औरंगाबादकरांनो 'या' तारखेपासून वापरा पार्किंग ॲप!

Parking App
Parking AppTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी यांच्या प्रयत्नातून शहराचे पार्किंग धोरण तयार करण्यात आले आहे. याच माध्यमातून शहरातील पार्किंग सुव्यवस्थित करण्यासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी औरंगाबादकर आता या ॲपची मदत घेऊ शकणार आहेत.

Parking App
720 कोटींच्या 'या' मार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी भविष्यवाणी

हे धोरण राबविण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीतर्फे कर्ब्लेट हे ॲप तयार करण्यात आले आहे. यासाठी स्थानिक स्टार्ट अप सोबत कारार करण्यात आला आहे. येत्या 1 ऑगस्टला हे ॲप लॉन्च करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून आपल्या पार्किंगची जागा बुक करता येईल. या मोबाईल ॲपद्वारे नागरिक आपली गाडी पार्क करण्यासाठी स्वतः जागा निवडू शकतात. यामुळे त्यांना त्यांची गाडी लवकर सापडण्यास मदत होईल. 1, 2 तास आधी सुद्धा पार्किंगची जागा बुक करता येईल. सुरवातीचे दोन महिने विनामूल्य पार्किंग करता येईल, नंतर पार्किंग पॉलिसीमध्ये ठरवलेल्या दरांत पार्किंग करता येईल.

Parking App
'या' कारणामुळे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची पुन्हा रखडपट्टी

शहरातील 7 पायलट जागा यासाठी निवडण्यात आल्या आहेत. यामध्ये निराला बाजार, उस्मानपुरा, कॅनॉट परिसर, अदालत रोड, पुंडलिक नगर, टीव्ही सेंटर आणि सूतगिरणी चौक यांचा समावेश आहे. या 7 ठिकाणी सुरवातीला हे धोरण राबविण्यात येईल. या जागांवर ॲपच्या माध्यमांतून बुकिंग करता येईल. सुरवातीला महिने ट्रायलसाठी विनामूल्य पार्किंग सुविधा देण्यात येणार आहे. यादरम्यान पार्किंग फी आणि दंड आकारण्यात येणार नाही. यामुळे नागरिकांना ॲपचा वापर आणि पार्किंग धोरणाचे नियम लक्षात येतील.

Parking App
Pune Ring road: 'या' शेतकऱ्यांना मिळणार तब्बल पाचपट मोबदला

शहरासाठी तयार करण्यात आलेले पार्किंग धोरण नागरिकांच्या सूचना आणि अभिप्राय मिळविण्यासाठी खुले करण्यात आले होते. 20 जुलै यासाठी अंतिम मुदत होती. यादरम्यान बऱ्याच नागरिकांनी आपल्या सूचना आणि अभिप्राय दिले आहेत. हे अभिप्राय आणि सूचना पार्किंग धोरणात समाविष्ट करण्याचे काम सध्या सुरू आहे.

करब्लेट या स्टार्टअपला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. यांनी नावीन्यपूर्ण उपाययोजना सुचवल्याने आणि शहरातील स्टार्टअप असल्याने यांना संधी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या, वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण इत्यादी समस्या सुटण्यास मदत होईल आणि पार्किंगसाठी होणारा त्रासही वाचेल, अशी प्रशासनाला आशा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com