Yavatmal : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; 'या' रस्त्यासाठी 24.48 कोटींचा निधी

Yavatmal
YavatmalTendernama

यवतमाळ (Yavatmal) : वेकोलिच्या वाहतुकीमुळे वणी तालुक्यातील येणक, येनाडी, कोळगाव, साखरा, शिवणी व शिंदोला या सात ते आठ गावांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. या गावाचा मुख्य रस्ता पूर्णतः उखडून गेला. झालेल्या पिकांची नुकसान भरपाई व रस्ता पूर्ववत करून मिळावा, याकरिता शेतकऱ्यांनी वेकोलिची वाहतूक बंद केली होती. सर्व शेतकऱ्यांसह मनसेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

Yavatmal
Eknath Shinde : PM मोदींच्या गुजरातला महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात मागे टाकलेय का? काय म्हणाले CM शिंदे?

परिणामी या आंदोलनाची दखल घेत वेकोलिने या रस्त्यासाठी 24.48 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला. ही वाहतूक पूर्ववत व्हावी व या समस्येवर तोडगा निघावा यासाठी 12 डिसेंबर 2023 रोजी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संबंधित सर्व विभाग व शेतकऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती. 

या बैठकीला वणीचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार, कृषी अधिकारी, मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक उपस्थित होते. हेक्टरी 25 क्विंटल या हिशेबाने हमी भावानुसार भरपाई देण्यात आली. मुजोर आणि निगरगट्ट प्रशासनाला नमती भूमिका घेत अखेर मनसेच्या मागण्या मान्य कराव्या लागल्याने शेतकरी तसेच गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर रस्त्यासाठी वेकोलिकडून 24.48 कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आला.

Yavatmal
Mumbai : मुंबईतील 'त्या' म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासाबाबत सरकारचा मोठा निर्णय

आम्ही सर्व शेतकऱ्यांनी याबाबत मनसेकडे व्यथा मांडल्या. त्याची दखल घेत मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केले. त्यामुळेच हा विषय मार्गी लागू शकला. रस्त्याच्या कामाला आता लवकरच सुरवात होईल, अशी प्रतिक्रिया शेतकरी मारोती मिलमिले यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com