'या' कारणांमुळे नितीन गडकरी ठरले 'विकास पुरुष'; वाचा सविस्तर...

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama

नागपूर (Nagpur) : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (Builder Association Of India) पश्चिम क्षेत्रीय राष्ट्रीय संमेलन सात ऑगस्ट रोजी हॉटेल सेंटर पॉईन्ट येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर मुंडले (Prabhakar Mundale) यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना 'विकास पुरुष' (Vikas Purush) ही उपाधी प्रदान केली जाणार आहे, अशी माहिती नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रदीप नगरारे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र आठवले यांनी पत्रकारांना दिली.

Nitin Gadkari
मुंबई पूरमुक्त करणाऱ्या 350 कोटींच्या 'या' प्रकल्पाचे टेंडर निघाले

सकाळी दहा ते १२ वाजेपर्यंत कार्यकारिणीची सभा होणार आहे. दुपारी १.३० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यस्तरीय प्रतिनिधींची बैठक होणार आहे. या संमेलनाला देशभरातून ४०० पेक्षा अधिक प्रतिनिधी येणार आहेत. सांयकाळी सात वाजता सत्कार सोहळा आयोजित केला आहे. २० वर्षानंतर राष्ट्रीय संमेलन नागपुरात होत आहे.

Nitin Gadkari
औरंगाबाद : 'त्या' अभियंता, ठेकेदाराच्या कामावर न्यायालय संतप्त

ब्रिटिशांच्या काळापासून म्हणजे १९४१ पासून ही संघटना बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. देशभरातील पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रातील संघटनेच्या सदस्यांनी यात मोठे योगदान दिलेले आहे. प्रभाकर मुंडले यांचे बांधकाम क्षेत्रात असलेल्या योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात येणार आहे. तर देशात पायाभूत सुविधा उभारण्याचे काम नितीन गडकरी करीत आहेत, त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात येणार आहे, असे राजेंद्र आठवले यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com