Wardha News : वर्ध्यातील 'हे' क्रीडा संकुल लवकरच कात टाकणार
Wardha News वर्धा : वर्धा शहरात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाची सध्या दुरावस्था झाली आहे, त्यामुळे येथे दररोज सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे. आता ही गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभागाने तयारी सुरू केली आहे. या क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणासोबतच विविध क्रीडा संकुलांच्या कायाकल्पासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
खेलो इंडिया अंतर्गत, विविध खेळांकडे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून उपक्रम राबवले जातात. ज्यात वर्धा जिल्ह्यातिल क्रीडा विभाग मागे नाही. जिल्हा क्रीडा संकुलात व्हॉलीबॉल, टेनिस, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, बॅट मिंटन, क्रिकेट, नेमबाजी, तलवारबाजी, रनिंग ट्रॅक, कराटे, बास्केटबॉल यासह विविध खेळ खेळले जाते. मात्र आतापर्यंत निधीअभावी या स्टेडियममध्ये सोयीसुविधांचा अभाव होता.
आता हे स्टेडियम दीड कोटी रुपये खर्चून दुरुस्त करून आधुनिक केले जाईल, जेणेकरून येणाऱ्या काळात येथील खेळाडूंना उच्चस्तरीय सुविधा पुरविल्या जातील. टेनिस कोर्टची पुनर्बांधणी करण्यात येणार असून, त्यात आधुनिक उपकरणे बसविण्यात येणार असून, या कामासाठी सध्या 7 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यासोबतच मैदानावर बास्केटबॉल मैदान तयार करण्यात येत आहे. एक मैदान तयार असून दुसऱ्या मैदानाचे काम सुरू आहे. या कामावर सात लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. बॉक्सिंग कोटला वॉटरप्रूफिंग करण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून पावसामुळे मुलांच्या प्रशिक्षणात कोणताही अडथळा येणार नाही.
क्रिकेट पीच सुद्धा बनविले जात आहे. बॅडमिंटन कोर्टाचीही दुरुस्ती केली जात आहे. शूटिंग रेंजच्या कोटचेही आधुनिकीकरण केले जात आहे.
डिसेंबरपर्यंत सोईसुविधा उपलब्ध होणार
जिल्हा क्रीडा संकुलात खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. सध्या खेळाडूंना सुविधा मिळण्याच्या दृष्टीने विविध खेळांसाठी अत्याधुनिक कोट बांधण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर 2024 पर्यंत संपूर्ण सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती वर्ध्याचे क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांनी दिली.