Wardha : देवेंद्र फडणवीसांकडून आरोग्यदायी दिवाळी भेट; 'ही' मागणी केली पूर्ण

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

वर्धा (Wardha) : अमरावती - नागपूर या महत्त्वाच्या महामार्गावरील तळेगाव (श्याम पंत) या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज आरोग्य सुविधा मिळाव्या याकरिता शासकीय रुग्णालयाची मागणी होती. अखेर राज्य शासनाने याची दखल घेत 300 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयास मंजुरी प्रदान केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे स्वीय सहायक तथा लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे यांनी दिली. ही तळेगावकरांसाठी शासनाची आरोग्यदायी दिवाळी भेट ठरली आहे.

Devendra Fadnavis
Nashik : ओझर HAL ला मिळणारा 11 हजार कोटींचे काम

आर्वी विधानसभा क्षेत्रातील तळेगाव (श्याम.पंत.) हे महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. या महामार्गावर मोठा अपघात झाल्यास रुग्णाला वर्धा, अमरावती किंवा नागपूर येथे उपचाराकरिता दाखल करावे लागते. यामध्ये वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. बरेचदा गंभीर जखमींना वेळीच उपचार न मिळाल्याने जीवही गमवावा लागतो. या परिसरात सुसज्य आरोग्य सुविधेचा बॅकलॉग असल्याने स्थानिक नागरिकांनी तळेगाव येथे सुसज्ज शासकीय रुग्णालय देण्याची मागणी केली होती.

यासंदर्भात लोकसभा निवडणूक प्रमुख यांना निवेदन दिले होते. त्यांनी याप्रकरणी शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर शासनाने तळेगाव येथे 300 खाटांच्या शासकीय रुग्णालयास मान्यता दिल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या रुग्णालयाकरिता तळेगाव येथे महसूल विभागाची 25 एकर जमीन उपलब्ध असून, या जागेवर रुग्णालयाची सुसज्य इमारत तयार होणार आहे. वानखेडे यांच्या प्रयत्नाने नुकतीच आर्वी उपजिल्हा रुग्णालयासाठी 100 खाटांच्या आधुनिक सुविधांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यानंतर लगेच शासकीय रुग्णालयालाही शासनाने हिरवी झेंडी दिल्याने आर्वी, आष्टी, कारंजा या तालुक्यांसह अमरावती व नागपूर जिल्ह्यातीलही तालुक्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.

Devendra Fadnavis
Jalgaon : गुलाबराव पाटलांची मोठी घोषणा; जळगाव जिल्ह्यातील 'त्या' 1,845 कुटुंबांसाठी गुड न्यूज

आर्वी तालुक्यातील तळेगाव येथील महसूल विभागाच्या जागेवर शासकीय रुग्णालयाकरिता शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात शासनाने आदेशही काढला असून, आता शासनाच्या पुढील निर्देशानुसार रुग्णालयाबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

रेफर थांबणार

तळेगावाशी आजूबाजूच्या सात ते आठ तालुक्यांचा आहेत. या सर्वांचा विचार करूनच रुग्णालयाची संपर्क येतो. हे नागपूर-अमरावती महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे शासकीय रुग्णालयाची मागणी होती. या परिसरात मोठा अपघात किया आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास उपचाराकरिता डॉक्टर वर्धा, अमरावती किवा नागपूरला रेफर करतात. यात वेळ आणि पैशाचाही चुराडा होतो. वेळीच उपचार न मिळल्याने काहीचे प्राणही गेले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com