Tumsar : 'मॉयल'ची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना का ठरली पांढरा हत्ती? CSR निधीचा दुरुपयोग?

Tumsar Moil
Tumsar MoilTendernama

भंडारा (Bhandara) : तुमसर तालुक्यातील चिखला खाण (मॉयल) अंतर्गत सीएसआर (CSR) फंडातून कोट्यवधी रुपये खर्च करून बावनथडी नदीपात्रात मॉयलची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. मात्र त्या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या विहिरी कोरड्याच असल्यामुळे मॉयलची ती योजना पांढरा हत्ती ठरला आहे. येथे सीएसआर निधीचा सर्रास दुरुपयोग केला जात आहे.

Tumsar Moil
Nashik : सिंहस्थात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उभारणार क्राउड मॅनेजमेंट सिस्टिम

आशिया खंडात प्रसिद्ध तुमसर तालुक्यात डोंगरी बुज. व चिखला येथे दोन मॅग्निजच्या खाणी (मॉयल) आहेत. चिखला मॉयलला गत 40 वर्षांपासून ते आतापर्यंत गोबरवाही प्रादेशिक नळ योजना अंतर्गत पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र मॉयलच्या अधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लढवून सीएसआर निधी अंतर्गत कोट्यवधी रुपयांचाचा दुरुपयोग केला आहे.

वास्तविकरीत्या मॉयलने एवढा निधी खर्च न करता जर गोबरवाही प्रादेशिक नळ योजनेवर खर्च केले असते तर ती योजना आणखी चांगली सुरळीतपणे सुरू असती. मॉयलला गोबरवाही प्रादेशिक नळ योजने अंतर्गत पाणीपुरवठा होत आहे. मॉयलला एवढा निधी खर्च करण्याची गरज का भासली हे न समजणारे कोडे आहे.

Tumsar Moil
Samruddhi Mahamarg : मुंबई - नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट; 755 कोटी खर्चून 'समृद्धी'ला जोडणार

जर सीएसआर निधी खर्च करायचेच होते तर बावनथडीच्या धरणावर 23 गावांसाठी शासकीय योजनेंतर्गत 19 कोटी रुपये खर्च करून वॉटर फिल्टर आलेसूर येथे तयार करण्यात आले आहे. परंतु ते 20 वर्षांपासून बंद होते. दरम्यान, तत्कालीन सरकारने मागील वर्षात पाणीटंचाई अंतर्गत 4.50 कोटी मंजूर करून त्या वॉटर फिल्टरवर काम केले. परिणामी काही गावांना आता पाणी मिळणे सुरू झाले आहे. मात्र अजूनही काही गावे पाण्यापासून वंचितच आहेत. त्यात जिल्हा परिषद व पाणीपुरवठा प्राधिकरण यामध्ये ही योजना कोण चालवेल यासाठी वाद सुरू आहे.

Tumsar Moil
Nagpur : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नागपुरात सुरू होणार 'हे' नवे प्रकल्प

मॉयलने बावनथडी नदी पात्रात पाणीपुरवठाची स्वतंत्र योजना तयार न करता मॉयलच्या सीएसआर फंडातून आलेसूर येथे तयार असलेली वॉटर फिल्टर योजनेवर स्वतंत्र हाताळणी करून चालवायला पाहिजे होती.

मोठ्या उद्योगाने त्यांच्या नफ्यातून सामाजिक परिवर्तनाचा वाटाही उचलावा. यासाठी सीएसआर म्हणजेच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही संकल्पना अस्तिवात आली. मात्र मॉयलची कसल्याही प्रकारची आजूबाजूच्या गावांना मदत होत नाही. याकडे जनप्रतिनिधींनी आर्वजून लक्ष द्यावे. अन्यथा आम्हाला आंदोलनाचे हत्यार उगारावे लागेल, अशी प्रतिक्रिया ठाकचंद मुंगूसमारे, जिल्हा अध्यक्ष रायुकाँ (शरद पवार गट) यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com