Sudhir Mungantiwar : चंद्रपुरातील मोरवा विमानतळाचा 'असा' होणार विकास; 17 कोटींच्या...

Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarTendernama

चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर व गडचिरोली (Chandrapur And Gadchiroli) जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी आठ कंपन्यांकडून विमानांची व्यवस्था केली जाणार आहे. सेस्ना कंपनीची (एक इंजिन) दोन विमाने, दोन इंजिनचे एक विमान अशी तीन विमाने मोरवा विमानतळाला मिळणार आहेत. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लबच्या प्रगतीचा नियोजन भवनात आढावा घेतला.

प्रशिक्षणार्थी विमानाचे उड्डाण करण्यासाठी मोरवा येथील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी 63 लाख, तर संरक्षण भिंतीसाठी 11 कोटी 93 लाख तातडीने मंजूर करण्याच्या सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या.

Sudhir Mungantiwar
Nashik : शिंदे गटाची भाजपवर मात! नाशिकचे IT पार्क आता राजूर बहुल्यात

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, साहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., कॅप्टन इझिलारसन, सहकारी अभियंता सादत बेग, हरीश कश्यप आदी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील धावपट्टीचे कार्पेटिंग गतीने करावे, यात संबंधित यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे. निवड करताना पहिल्या टप्प्यातील 10 प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मागास प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा समावेश आवर्जून करावा, अशी सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर फ्लाइंग क्लबच्या विकासाबाबत बैठकीत सादरीकरण केले.

या आहेत कंपन्या...

केंद्र शासनाच्या कोल इंडिया, ओ.एन.जी.सी., इंडियन ऑईल, जे.एन.पी.टी., हिंदुजा, अदानी, टाटा, बिरला आदी उद्योग समूहांच्या सामाजिक दायित्व निधीतून (CSR Fund) विमानांची व्यवस्था करणार आहे. त्यासाठी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केली.

Sudhir Mungantiwar
Nashik : नाशिक तालुक्यात मध्यरात्री प्रशासनाची मोठी कारवाई; सारूळच्या 5 क्रशरवर...

एखाद्या विद्यार्थ्याला वैमानिक होण्यासाठी 200 तास फ्लाईंग अवर्स पूर्ण करावे लागतात. मात्र नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठ्या संख्येने होणाऱ्या विमानांच्या आवागमनामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी फ्लाईंग अवर्स पूर्ण होण्यास विलंब होतो. त्यामुळे पर्यायी ऑपरेशनल बेस म्हणून चंद्रपुरातील मोरवा विमानतळाचा पर्याय उत्तम असून, युवक-युवतींना वैमानिक होण्याची ही सुवर्णसंधी आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

असे आहेत निधीचे टप्पे :

5 कोटी 63 लाख, संरक्षण भींत - 11 कोटी 93 लाख, दुसऱ्या टप्प्यात हँगर - 10 कोटी, फ्रंट कार्यालय 37 लाख, अप्रोच मार्ग -  2 कोटी 50 लाख.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com