Amravati
AmravatiTendernama

अमरावती जिल्ह्यात 'महसूल'चा धडाका; 103 कोटींची वसुली

अमरावती (Amravati) : अमरावती जिल्ह्यात महसूल विभागाला मागील वर्षी गौण खनिजामधून 60.65 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यामध्ये रॉयल्टी, दंडात्मक प्रकरणांचा समावेश आहे. काही प्रकरणात अद्याप वसुली बाकी आहे. याशिवाय काही प्रकरणात साहित्यही जप्त करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

Amravati
Nagpur: 717 कोटींची तरतूद तरी हजारो नागरिक 'या' सुविधेपासून वंचित

वाळू घाट व गिट्टी खदान, मुरुम व माती आदी प्रकरणात रॉयल्टीचा भरणा केल्यानंतरच परवानगी देण्यात येते. संबंधितांनी शर्तभंग केल्यास महसूल विभागाद्वारा दंडात्मक कारवाई केल्या जाते. किंबहुना, प्रशासनाला सर्वाधिक महसूल गौण खनिजातूनच मिळतो. वाळूचा नियमबाह्य उपसा, गौण खनिजांचे उत्खनन रोखण्यासाठी पथके गठीत करण्यात आलेली आहेत, याशिवाय अन्य मार्गाने येणारी वाळू रोखण्यासाठी पथकांचा वॉच असतो. वाहने आढळल्यास त्यांच्यावर दंडाची कारवाई, तर कधी गुन्हाही दाखल होतो.

66 कोटींचा महसूल जमा

2022-23 मध्ये जिल्ह्यात गौण खनिजातून 60.65 कोटी रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाकडे जमा झालेला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 14 तालुक्यांसह जिल्हा खनिकर्म विभागाद्वारा विविध प्रकरणांत दंड व रॉयल्टीद्वारे हा महसूल गोळा झालेला आहे.

Amravati
Mumbai : 'या' ठिकाणी होणार नवे कारशेड; 2,352 कोटींचे बजेट

तालुक्यानुसार जमा झालेला महसूल

वरूड - 3.58, अमरावती - 4.85, भातकुली 2.26, तिवसा - 2.68, चांदूर रेल्वे - 1.32, धामणगाव - 1.28, नांदगाव - 1.28,  चिखलदरा - 8.61, मोर्शी - 2.09, जिल्हा कार्यालय - 41.88, अचलपूर - 4.60, चांदूरबाजार - 3.12, दर्यापूर - 2.24, अंजनगाव - 2.21, धारणी - 1.37 असा महसूल जमा झाला आहे.

सर्वाधिक उत्खनन नदीकाठच्या गावांमध्ये

सर्वाधिक उत्खनन ग्रामीणमध्ये तिवसा, धामणगाव, भातकुली, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे व अचलपूर तालुक्यात होत आहे.

103.77 कोटींची वसुली

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 3 मार्चअखेर 103.77 कोटींच्या महसुलाची वसुली झालेली आहे. यामध्ये गौण खनिज, रॉयल्टी, दंड आदी प्रकारात 60.65 कोटी प्राप्त झाले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) रणजित भोसले यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com