नागपूर (Nagpur) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते शनिवार 14 ऑक्टोबर 2023 ला झिरो माईल मेट्रो स्टेशन जवळील मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायंस या प्रस्तावित भूयारी मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर निर्माण कार्य हे सेंट्रल रोड फंड (CRF) अंतर्गत असून महामेट्रोच्या वतीने केले जाणार आहे. प्रस्तावित भुयारी मार्ग हा 870 मीटर लांब असून, या ठिकाणी तीन प्रवेश (Entry)/निर्गमन (Exit) राहणार आहेत.
या भुयारी मार्गामध्ये तीन बॉक्स - 5.5 मी X 5.5 मी (प्रत्येकी 2) आणि 10.मी X 5.5 मी (एक) अशी राहणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत रु. 79.67 कोटी एवढी आहे या भुयारी मार्गामुळे मानस चौक ते लोखंडी पूल (लोहा पूल) येथील गर्दी कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल. सदर भुयारी मार्ग हा वर्धा रोडच्या (राष्ट्रीय महामार्ग) दोन्ही बाजूंनी असेल.
प्रस्तावित भुयारी मार्गामुळे भवन शाळा, बीएसएनएल कार्यालय, वनविभाग कार्यालय यासारख्या नामांकित संस्थांसह जवळील परिसरातील गर्दी कमी करण्यात मदत होईल.
महामेट्रोने लोहापूल येथील अंडरपास आणि राम झुला ते एलआयसी आणि आरबीआय चौकी पर्यंतचा वाय-शेप उड्डाणपूलाचे काम केले असून, या वर्षाच्या सुरुवातील याचे उद्घाटन देखील करण्यात आले. या सोबतच महामेट्रोने नागपूर रेल्वे स्टेशन समोरील उडाणपूल पाडून प्रस्तावित रस्त्याचे निर्माण कार्य हाती घेतले आहे.
मानस चौक,लोखंडी पूल (लोहा पुल), झिरो माईल, वर्धा रोड, अंसारी रोड यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश असलेल्या संपूर्ण परिसरात सर्वत्र वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. प्रस्तावित भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर या भागातील गर्दी कमी होण्यास मदत होईल.