Nagpur: पोलिस मुख्यालयाचे 3 प्रस्ताव PWD ने का रोखले?

PWD
PWDTendernama

नागपूर (Nagpur) : पीडब्ल्यूडीने (PWD) नागपूर शहर पोलिस मुख्यालयाचे तीन प्रस्ताव थंड्या बस्तात ठेवले आहेत. हे तिन्ही प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचे आहेत, परंतु या प्रस्तावावर विचार करण्यास आणि लक्ष देण्यास कोणत्याही पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याला वेळ नाही.

PWD
Good News : नागपूर महापालिकेत बंपर भरती; तब्बल 'एवढ्या' जागांसाठी

पोलिस मुख्यालय व्यवस्थापनाने हे तिन्ही प्रस्ताव पीडब्ल्यूडीकडे 2-3 वेळा पाठवले आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. परेड ग्राऊंडजवळ बांधण्यात आलेल्या संवेदनशील इमारतीची सुरक्षा भिंत बांधण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या संवेदनशील इमारतीत पोलिस विभागाच्या अनेक महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

पावसाळ्याच्या दिवसात पोलिसांना कवायत करण्यासाठी मैदानात उपस्थित राहावे लागते. अशा स्थितीत याठिकाणी टिनशेड बसविल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना पाऊसा पासून बचाव होईल. पोलिस मुख्यालयाच्या आत कर्तव्यावर असलेल्या महिलांसाठी विश्रामगृहाचा प्रस्तावही पीडब्ल्यूडीकडे पाठविण्यात आला होता. परंतु त्या प्रस्तावाचीही विभागाने दखल घेतली नाही. या तीन प्रस्तावांवर सुमारे 1.50 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.

स्वत: केला जुगाड

पोलिस मुख्यालयातील अनेक संवेदनशील ठिकाणी सुरक्षा भिंती बांधणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की वारंवार प्रस्ताव देऊनही पीडब्ल्यूडीकडून कोणताही पुढाकार दिसत नसल्याने मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा भिंतीसाठी अनेक ठिकाणी घेराव घालण्यास सुरुवात केली. येण्या-जाण्यास मनाई असतानाही ज्या ठिकाणाहून लोकांची ये-जा सुरू होती ती ठिकाणे यामुळे बंद झाली आहेत. आता अशा ठिकाणी पोलिस मुख्यालयाने स्वत:हून आपल्या स्तरावर बंदी लावली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक - 1 चे कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार यांना या संबंधित विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पदभार ग्रहण केले. त्यामुळे त्यांना सुद्धा या प्रस्तावाबद्दल माहिती नाही.

PWD
2 हजार कोटी खर्चाच्या 'मुंबई आय'साठी MMRDAचे टेंडर

अनेकदा पाठवला प्रस्ताव

पोलिस मुख्यालयाचे आरपीआय विजयसिंह परिहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड क्वार्टरच्या मागे बांधलेल्या संवेदनशील इमारतीच्या सुरक्षा भिंतीसाठी सुमारे 50 लाख रुपयांचा प्रस्ताव पीडब्ल्यूडीकडे पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव थंड बसत्यात ठेवण्यात आला. तसेच सकाळ-संध्याकाळ रोल कॉलसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर टिनशेड बसविण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता, मात्र तो प्रस्तावही कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आला. तसेच महिला कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयाच्या आवारात विश्रामगृहाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यावरही चर्चा झाली नाही.

पोलिस मुख्यालय संकुलाचे हे तीन प्रस्ताव तयार करण्यासाठी सुमारे 1.50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता, परंतु आजतागायत पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडून कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तर हे तीन मुख्यालयाचे मुख्य प्रस्ताव होते, जे सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही अतिशय महत्त्वाचे मानले जातात. तिन्ही प्रस्ताव अनेकवेळा पाठविण्यात आले मात्र पोलिस मुख्यालयातील आरपीआय विजयसिंह परिहार यांच्या या प्रस्तावावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काहीही विचार केलेला दिसत नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com