Nagpur: 'समृद्धी'वरील अपघातग्रस्तांच्या उपचारांचे काय? नवा निर्णय

Samruddhi Mahamargh
Samruddhi MahamarghTendernama

नागपूर (Nagpur) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) होत असलेल्या अपघातांमुळे खळबळ उडाली आहे. या महामार्गाच्या बांधकामाबाबत सर्वसामान्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे याला मृत्यूचा महामार्ग म्हटले जात आहे.

Samruddhi Mahamargh
पालकमंत्री भुसेंचे नाशिककरांना दहा हजार कोटींचे गिफ्ट, पाहा काय?

अपघातग्रस्तांच्या उपचाराबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याने अपघातग्रस्तांवर उपचार करण्याचा नवा पर्याय निवडण्यात आला आहे. रस्ते विकास प्राधिकरण, एक्सप्रेस-वे कॉर्पोरेशन यांच्याशी करार करण्यात आला आहे.

वानाडोंगरी येथे रुग्णालय 

रस्ते विकास प्राधिकरण, एक्सप्रेस-वे कॉर्पोरेशनने वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयाशी करार केला आहे. या करारानुसार समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांवर रुग्णालयाशी संलग्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी संस्थेत उपचार केले जाणार आहेत. अपघातग्रस्तांना येथे अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येथे 65 खाटांची आयसीयू क्षमता आहे. 30 खाटांचे इमर्जन्सी मेडिसिन कॉम्प्लेक्स, 450 खाटांचे 7 हायटेक ऑपरेशन थिएटर्ससह सामान्य सुविधा, 5 डॉक्टरांची टीम 24 बाय 7 सेवा पुरवते. 

Samruddhi Mahamargh
UAE सरकारचा नाशिक विमानतळाबाबत महत्त्वाचा निर्णय; आता...

रुग्णालयात विविध शासकीय योजनांतर्गत उपचार सेवा देण्यात येणार आहेत. सुपरस्पेशालिटी उपचारांसाठी 2000 खाटांची क्षमता असलेल्या दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन केंद्रातही उपचार सुविधा उपलब्ध असतील. या करारावर दत्ता मेघे ग्रुपच्यावतीने सागर मेघे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुप मरार, अभिमत विद्यापीठाचे डीन डॉ. उज्ज्वल गजबे, डेप्युटी डीन डॉ. ब्रिज सिंग, डॉ. सुधीर सिंग, उपमुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत गावंडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com