Nagpur: क्रीडा संकुलावर अनधिकृत कब्जा; कंत्राटदाराविरोधात तक्रार

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) आग्याराम देवी चौकात स्थित संत तुकडोजी महाराज, क्रीडा संकुलावर अनधिकृत रित्या कब्जा करण्याचा प्रयत्न कंत्राटदाराकडून (Contractor) करण्यात आला. यासंदर्भात मनपाद्वारे गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nagpur
CM Eknath Shinde : भाईंदर ते दहिसर लिंक रोडचे काम लवकरच

आग्याराम देवी चौक येथे मनपाच्या मालकीचे संत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल आहे. सदर क्रीडा संकुलाचे देखभाल दुरुस्तीचे कंत्राटदार शैलेंद्र मधुकरराव घाटे यांच्याकडे होते. यांचे कंत्राट संपुष्टात आले असून, यांच्यामार्फत संकुलामध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संकुलाला कुलूप लावणे, गाड्या ठेवणे, कर्मचाऱ्यांना धमकी देणे याप्रकरणी त्यांच्या  विरोधात गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार मनपाचे क्रीडा अधिकारी डॉक्टर पियुष आंबुलकर यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे.

कंत्राटदार शैलेंद्र मधुकरराव घाटे यांचे कंत्राट संपल्यानंतर संकुलात ठेवण्यात आलेले व्यायाम साहित्य टेबल खुर्ची लोखंडी कपाट घेऊन जाण्यासाठी पत्र देण्यात आले होते. मात्र पत्र देऊन सुद्धा अद्याप त्यांनी साहित्य परत नेले नाही.

Nagpur
गडकरीजी, कधी होणार 'या' राष्ट्रीय महामार्गाचे काम?; नागरिकांचा जीव

मागिल काही दिवसांपासून कंत्राटदाराकडून विनाकारण संकुलामध्ये येवून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे व जबरदस्तीने स्वतःच्या चारचाकी गाड्या पार्क करणे, इत्यादी कृती करून मनपाच्या कामात अडथळे निर्माण केला जात आहे. तसेच नागपूर महानगर पालिकेतर्फे स्विमिंग पुलाच्या लोखंडी चॅनल गेटवर कुलूप लावण्यात आले आहे. मात्र कंत्राटदाराने या ठिकाणी स्वतःचे कुलूप लावले आहे. तसेच बाहेरच्या परिसरातील गेटवर, दारांवर देखील बळजबरीने कुलूप लावून संकुलावर स्वतःचा ताबा करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

Nagpur
Nagpur: नागपुरातील 'तो' प्रसिद्ध उड्डाणपूल पाडण्याचा मुहूर्त ठरला?

याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर क्रीडा अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांसह पाहणी केली असता तेथे कंत्राटदाराद्वरे स्वतःचे कुलूप लावल्याचे निर्देशनात आले. ही शासकीय संपत्ती असल्यामुळे पोलिस यंत्रणेतर्फे गांर्भीयाने दखल घ्यावी आणि घुसखोरी व ताबा घेण्याचा प्रयत्न व शासकीय कामामध्ये अडथळे आणणे याबाबत पोलिस कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com