उमरेड-मोहपा मार्गाचा वनवास संपणार; सरकारने काय घेतला निर्णय?

अवजड वाहतुकीमुळे होणार सिमेंट काँक्रिटीकरण
Mumbai Pune Expressway accident
Mumbai Pune Expressway accidentTendernama
Published on

मुंबई (Mumbai): नागपूर जिल्ह्यातील उमरेड-मोहपा मार्गावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि दुरवस्था लक्षात घेता, या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या रस्त्यावरील अवजड वाहतूक पाहता काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव तयार असून, हे काम प्राधान्याने हाती घेतले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत केली.

Mumbai Pune Expressway accident
Samruddhi Mahamarg News: महामार्गावर वीज निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग 'समृद्धी'वर

या मार्गावरील दुर्दैवी घटनांचा मुद्दा आमदार संजय मेश्राम यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात मांडला होता. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी उमरेड-मोहपा मार्गावरील खड्ड्यांमुळे एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या संवेदनशील विषयावर उत्तर देताना मंत्र्यांनी रस्ते सुधारणेची ग्वाही दिली.

मंत्री भोसले यांनी या मार्गाच्या दुरवस्थेची कारणे स्पष्ट करताना सांगितले की, या परिसरात मोठ्या प्रमाणात दगड खाणी आणि स्टोन क्रशर्स आहेत. खाणींमधून साहित्याची ने-आण करण्यासाठी दिवस-रात्र अवजड ट्रकची वर्दळ असते, ज्यामुळे डांबरी रस्ते टिकत नाहीत. वारंवार पडणारे खड्डे बुजविण्यापेक्षा सिमेंट काँक्रिटीकरण हाच कायमस्वरूपी पर्याय असल्याने सरकारने याला मंजुरी दिली आहे.

Mumbai Pune Expressway accident
सिंहस्थ कुंभमेळा 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी पायाभूत सुविधा व सांस्कृतिक आराखडा अंतिम टप्प्यात

या मार्गाचा काही भाग वन विभागाच्या हद्दीतून जातो. वन जमिनीवरील रस्त्यांच्या कामासाठी विशेष परवानगी आवश्यक असते. या संदर्भात मंत्र्यांनी स्पष्ट केले की, वन विभागाच्या क्षेत्रातील रस्त्यासाठी डांबरीकरणाचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा करून वन विभागाची मंजुरी तातडीने मिळवण्यात येईल. मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून उमरेड-मोहपा मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मणक्याचे आजार आणि अपघातांचा सामना करावा लागत होता. आता मंत्र्यांच्या या आश्वासनानंतर या परिसरातील दळणवळण सुलभ होईल आणि भविष्यातील अपघात टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com