Nagpur: 'मेडिकल'मधील सोलर पार्क उभारण्याची प्रतिक्षा संपणार का?

GMCH Nagpur
GMCH NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : नुकतेच शासनाने मेयो (Mayo) आणि मेडिकलच्या (Government Medical Collage And Hospital Nagpur) विकासकामांसाठी एकूण 900 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रकमेच्या काही भागातून मेडिकलमध्ये सोलर पार्क (Solar Park) उभारणे अपेक्षित आहे.

सरकारी खात्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी विविध योजना तयार केल्या जातात तर काही अंमलात येतात तर काही शिल्लक राहतात. मेडिकलचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी सोलर पार्क तयार करण्याची योजना आखली. मेडिकलला वीजबिलापोटी दरमहा 25 लाखांहून अधिक रक्कम भरावी लागते, त्यामुळे याठिकाणी सोलर पार्क उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला होता. 2017 मध्ये तयार करण्यात आलेला हा प्रस्ताव अजूनही धूळ खात आहे.

GMCH Nagpur
Good News : जुनी पेंशन लागू करण्याबाबत केंद्राची मोठी घोषणा

टीबी वॉर्डमध्ये सोलर पार्क उभारण्याचा निर्णय

हा प्रस्ताव यावर्षी मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात सोलर पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये एका कंपनीच्या मदतीने सोलर पार्क उभारले जाणार होते. यामध्ये मेडिकलमध्ये पहिले सोलर पार्क उभारण्याचा प्रस्ताव होता.

त्यावेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या वतीने बी.एल. मधून सोलर पार्क करण्यासाठी जमिनीची तपासणी करण्यात आली. वॉर्ड क्र. 12, 13, 28, 32 आणि 33, मार्ड वसतिगृह, दंत महाविद्यालय, मुलांचे वसतिगृह आणि नर्सिंग वसतिगृह इत्यादी इमारतींवर सोलार किंवा पॅनेल बसवले जाणार होते.

GMCH Nagpur
Nashik ZP : 'जलजीवन'च्या 185 योजनांचे घोंगडे अडकले कुठे?

10 वर्षांनंतर मोफत वीज मिळणार

या योजनेसाठी 49 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य सरकारला केवळ 30 टक्के खर्च करावा लागणार होता. 70 टक्के रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून घ्यायची होती. पहिल्या टप्प्यात नऊ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम सुरू होणार होते. 10 वर्षात कर्ज फेडल्यानंतर मेडिकलला 20 वर्षे मोफत वीज मिळणार होती.

शासनाच्या वैद्यकीय संशोधन व शिक्षण मंडळाला हा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र या प्रस्तावावर विचार करण्यात आला नाही. सौर उद्यानाच्या निर्मितीमुळे हवेतील प्रदूषण म्हणजेच कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन संपणार होते, परंतु सरकार बदलल्यानंतर या प्रस्तावावर पुनर्विचार झाला नाही.

नुकतेच शासनाने मेयो आणि मेडिकलच्या विकासकामांसाठी एकूण 900 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रकमेमुळे सोलर पार्कच्या उभारणीच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com