Nagpur News : अंबाझरी धरणाची कामे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण होणार का?

Ambazari Dam
Ambazari DamTendernama

Nagpur News नागपूर : अंबाझरी धरणाच्या (Ambazari Lake) सांडव्याचे पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही पुलांचे बांधकाम, मातीबांध बळकटीकरणाचे कामे, क्रेझी कॅसल येथील उर्वरित दोन पूल तोडण्यासह परिसरातील नदी व नाले सफाई आदी अल्पमुदतीची कामे येत्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. 

Ambazari Dam
''स्मार्ट मीटर' म्हणजे नालेसाठी घोड्याची खरेदी! पैसा ग्राहकांचा, मालकी 'अदानीं'ची'

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी  करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वय समितीद्वारे सुरक्षेच्यादृष्टीने अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू असून हे काम वेळेत पूर्ण करून दुसऱ्या पुलाचे बांधकामही हाती घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी दिले.

ही कामे करतांना सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांनी वीज वाहिन्यांची कामे पूर्ण करण्यासह येथे वाहतुकीच्या दृष्टिने उचित उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Ambazari Dam
Nagpur : स्मार्ट प्रीपेड मीटर्स; वादग्रस्त 'मॉन्टे कार्लो' कंपनीला टेंडर

क्रेझी कॅसल परिसरात विविध उपाय योजनांतर्गत जवळपास 64 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. येथील एकूण 8 पूल तोडण्याची कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत 6 पूल तोडण्यात आली आहेत. उर्वरित 2 पूल जुनच्या पहिल्या पंधरावड्यापूर्वी तोडण्याचे निर्देश देत या भागातील नाग नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे कामही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणांतर्गत मातीबांध बळकटीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. शहरातील रस्त्यांवर धोकादायक स्थितीतील झाडांची छटाई तसेच नदी-नाल्यांच्या सफाईची कामेही नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी यंत्रणांना देण्यात आले.अंबाझरी धरण परिसरातील स्वामी विवेकानंद यांचा पुतळा स्थलांतरीत करण्याच्या विषयावरही चर्चा झाली. 

Ambazari Dam
Nashik : महापालिकेच्या 17 हजार कोटींच्या सिंहस्थ आराखड्याला कात्री लागणार?

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणाच्या कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येत असून, या कामांच्या प्रगतीचा अहवाल समितीतर्फे उच्च  न्यायालयाला नियमितपणे सादर  करण्यात येत आहे.

बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते, सदस्य जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अधिक्षक अभियंता ज. ह. भानुसे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी. के. पवार, मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह महामेट्रो, नागपूर सुधार प्रन्यास, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी विभागांचे अधिकारी  यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com