Nagpur News : महापालिका अलर्ट; अंबाझरी धरण बळकटीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू

Ambazari Dam
Ambazari DamTendernama

Nagpur News नागपूर : नागपूर शहरातील अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तलावाच्या बळकटीकरणासाठी 32.42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उपराजधानीत 23 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टिमुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि शहरात हाहाकार माजला. परिणामी, नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. भविष्यात अतिवृष्टीचा त्रास होऊ नये यासाठी तलाव बळकटीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत.

Ambazari Dam
Sambhajinagar : 4 आयुक्तांना जे जमले नाही ते G Shrikant यांनी करून दाखविले!

क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल आणि रस्त्यांसाठी 234.21 कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकार ने मंजुरी दिली. ज्यात 32.42 कोटी रुपये अंबाझरी धरण बळकटीकरणावर खर्च केले जात आहे. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक सर्व कामे पावसाळ्याआधी गतीने पूर्ण  करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.  

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समितीची सहावी बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.  

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी हाती घेण्यात आलेली कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध  यंत्रणांच्या समन्वयाद्वारे समितीने सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांना केल्या आहेत.

Ambazari Dam
स्मार्ट मीटर्सची टेंडर दुप्पटीने फुगवली; 'अदानीं'ना सर्वाधिक 14 हजार कोटींची टेंडर

यानुसार पहिल्या टप्प्यातील कामानंतर दुसऱ्या टप्प्या अंतर्गत या धरणाच्या जवळपास 42 हजार क्युबिक मीटरवर मातीबांध बळकटीकरणाचे कामे अंतिम टप्प्यात असून ही कामे पावसाळ्याआधीच पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी श्रीमती बिदरी यांनी जलसंपदा विभागाला दिले. 

अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाचे बांधकाम करताना वीज वाहिन्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांनी समन्वयाने पूर्ण करावीत. ही कामे पावासाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दिशेने नियोजन करावे. या ठिकाणी वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Ambazari Dam
Sambhajinagar : परवानगी नसतानाही AC च्या हवेने सरकारी अधिकारी चिल!

धरणाच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणारी अतिक्रमन तातडीने काढणे, परिसरातील नाग नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाची कामे, नाले सफाई आदी कामांनाही वेग देऊन पावसाळ्यापूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणाच्या कामांच्या प्रगतीचा नियमीत आढावा घेण्यात येत असून या कामांच्या प्रगतीचा अहवाल समितीतर्फे उच्च न्यायालयाला नियमितपणे सादर करण्यात येत आहे.

अंबाझरी धरणाच्या दुरुस्तीवर असा खर्च केला जाणार निधी 

दीडशे वर्ष जुने धरण असलेल्या अंबाझरी धरणाचे बळकटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यात जीर्ण भिंतींचे काँक्रिटीकरण आणि सुरक्षिततेसाठी 21.07 कोटी, तर माती धरण दुरुस्ती, दगडी पिचिंग, खाली एक ड्रेन इत्यादी कामांसाठी 11.35 कोटी रुपयांचा समावेश आहे. याशिवाय, महापालिकेने राज्य सरकारकडे 234.21 कोटी रुपयांचा एक प्रकल्प अहवाल सादर केला आहे.

क्षतिग्रस्त नदी, नाले बांधकाम, पूल, रस्त्यांचे काम आदी कामे तातडीने केली जात आहेत. अंबाझरी ते पंचशील चौकापर्यंत सुमारे 5 कि.मी.चे अंतर असलेल्या नदीचे खोलीकरण करण्यात येऊन त्यातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत  81,846 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com