Nagpur : नागपूर मेट्रोने केली कोट्यवधींची कमाई; महसुलात मोठी वाढ

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : Nagpur Metro नागपूर मेट्रोचा जसजसा विस्तार होत आहे, तसतसा महसूलही वाढत आहे. ही चांगली गोष्ट आहे की फेयर बॉक्स आणि नॉन-फेअर बॉक्स या दोन्ही श्रेणींमध्ये महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे.

Nagpur
Nagpur : नागपूर शहरापासून 80 किमीवर उभे राहतेय एक नवे आश्चर्य! लवकरच उद्घाटन

प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. गेल्या वर्षी 2022-23 मध्ये प्रवाशांची संख्या 2.43 कोटी होती. एका माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.  माहितीनुसार, या आर्थिक वर्षात (एप्रिल ते जुलै) 78 लाख लोकांनी मेट्रोचा आनंद लुटला आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2022-23 मध्ये 2.43 कोटी लोकांनी मेट्रोने प्रवास केला. त्याचप्रमाणे, मागील वर्ष 2020-21 मध्ये, प्रवाशांची संख्या केवळ 18 लाख होती. 

असे मानले जाते की जसा मेट्रोचा विस्तार झाला आणि नवीन स्थानके सुरू झाली आहेत, त्यानुसार प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. आज लाखो लोक प्रवास करू लागले आहेत.

Nagpur
Pune : रस्ते खोदाई करताना प्रशासनात समन्वयाचा अभाव; ठेकेदारावर काय कारवाई होणार?

महसूल वाढला

2020-21 या वर्षात महा मेट्रोला फेअर बॉक्स (तिकीट शुल्क) मधून 1.52 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. 2021-22 मध्ये ती वाढून 4.94 कोटी रुपये झाली, तर 2022-23 मध्ये 22.56 कोटींची पातळी गाठली. चालू आर्थिक वर्षाच्या 4 महिन्यांत मेट्रोला 13.27 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. फेयरमध्ये वृद्धी करण्याचा फायदा स्पष्टपणे दिसून येत आहे.

नॉन फेयर उत्पन्नात वाढ

महामेट्रोला अनेक वस्तूंमधून अतिरिक्त उत्पन्न मिळते. जाहिरात, भाडे व परवाना, एफएसआय, मुद्रांक शुल्क यातून महसूल मिळत आहे. यामध्ये प्रीमियम एफएसआय आणि मुद्रांक शुल्क महसूल हे सर्वांत महत्त्वाचे आहे. अतिरिक्त एफएसआयमधून महामेट्रोला 58 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच मुद्रांक शुल्कातून 50 कोटी रुपये मिळाले.

या दोन वस्तूंमधून महामेट्रोने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. याशिवाय जाहिरातीतून 2.87 कोटी रुपये आणि भाडे आणि परवान्यातून 1.59 कोटी रुपये कमावले आहेत.

Nagpur
Nashik ZP : सीईओ मित्तल यांच्याविरोधात ठेकेदार आक्रमक, काय आहे कारण...

मेट्रोचे आतापर्यंत उत्पन्न 

जाहिरात 2.87 कोटी, भाडे आणि परवाना 1.59 कोटी, एफएसआय 58 कोटी, स्टाम्प ड्यूटी 50 कोटी यातून मेट्रोला आतापर्यंत उत्पन्न मिळाले आहे.

फेयर बॉक्स

2020-21 : 1.52 कोटी रुपये

2021-22 :  4.94 कोटी रुपये

2022-23 : 22.56 कोटी रुपये

नॉन फेयर बॉक्स

2020-21 : 17.54 कोटी रुपये

2021-22 : 14.40 कोटी रुपये

2022-23 : 75.17 कोटी रुपये

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com