Nagpur: अंबाझरी उद्यान परिसरात आंबेडकर थीम पार्क अन् संग्रहालय

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : अंबाझरी उद्यान (Ambazari Garden) परिसराचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MSTDC) ही जागा मे. गरुडा अम्युजमेंट पार्क प्रा.लि.ला टेंडर (Tender) प्रक्रियेच्या माध्यमातून 30 वर्षांच्या लीजवर दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन उभारणार असल्याची माहिती मे. गरुडा ॲम्युजमेंट पार्कचे नरेंद्र जिचकार यांनी परिषदेत दिली.

Nagpur
Nashik : टोल प्लाझाचे टेंडर घेण्यासाठी सात लाखांची लाच घेताना अटक

या प्रकल्पात प्रवेशद्वार, फूड प्लाझा, मनोरंजन पार्क, श्री शिवाजी महाराज थीम पार्क, अम्फीथिएटर, योग ध्यान झोन, सेलिब्रेशन झोन, लघु शहर, क्रीड़ा थीम पार्क, जलक्रीडा सुविधा मस्त्यालय, लेक व्हा रेस्टॉरंट, संगीत कारंजे, नागपूर हाट, हस्तकला बाजार उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना मोकळ्या रानात सौंदर्यपूर्ण व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे.

हा प्रकल्प कुणाच्याही खासगी जागेवर नसून एमटीडीसीच्या जागेवर राबविला जात आहे. सर्व प्रकारच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच मे गरुडा अम्यूजमेंट पार्क प्रा. लि. हा प्रकल्प राबवित आहे. या परिसरात असलेले आंबेडकर भवन में गरुडा अम्युजमेंट पार्कने पाडलेले नाही. तर 8 जून 2021 रोजीच्या वादळामुळे पडले. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. यातून सत्य पुढे येईल, अशी माहिती नरेंद्र जिचकार यांनी दिली.

Nagpur
Nashik : नाशिक-पुणे रेल्वेसाठीचे भूसंपादन थांबवा; महारेलचे पत्र

भवन पाडल्याचा आरोप राजकीय हेतूने

आंबेडकर भवन पाडल्याचा आरोप केला जात आहे. आम्ही भवन पाडलेले नाही, किशोर गजभिये हा आरोप राजकीय हेतूने करीत असून, लोकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांना खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी प्रेम असेल तर त्यांनी शासनकडे पर्यायी जागेची मागणी करून नवीन भवन उभारावे, अशी भूमिका नरेंद्र जिचकार यांनी मांडली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com