Nagpur: नागपुरात 'या' ठिकाणी साकारणार मल्टीस्पोर्ट स्टेडियम

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील पाच दशकांपेक्षा अधिक जुने झालेले यशवंत स्टेडियम व महाल येथील चिटणीस पार्कचा पुनर्विकास होणार आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद येथे तयार करण्यात आलेल्या मल्टीस्पोर्ट स्टेडियमच्या धर्तीवर या दोन्ही स्टेडियमच्या विकासाची योजना महापालिकेने आखली आहे. महापालिका आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी या दोन्ही स्टेडियमचा आराखडा तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

Nagpur
मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरचा अंतिम आराखडा सादर

अहमदाबादमध्ये ट्रान्सस्टेडिया कंपनीने पायाभूत सुविधांसह क्रीडा प्रकाराला उद्योगासोबत जोडण्यात महत्त्वाची कामासाठी भूमिका बजावली आहे. नागपुरातही यशवंत स्टेडियम व चिटणीस पार्क स्टेडियमसाठी व्यावसायिक मॉडेल सल्लागाराकडून तयार केला जाणार आहे. त्यानंतर हे दोन्ही प्रकल्प पीपीपीनुसार राबविणार की इतर दुसऱ्या मॉडेलनुसार करणार, याबाबत महापालिका निर्णय घेणार आहे. यशवंत स्टेडियमला 53 वर्षे झाली आहे. त्यानुसार स्टेडियमचा विकास करने आवश्यक आहे.

Nagpur
Nashik : अखेर महापालिकेकडून 706 पदे भरतीचा मुहूर्त जाहीर

या प्रकल्पात व्यावसायिक संकुलही उभारण्यात येईल. यातून येणारी रक्कम देखभाल दुरुस्तीसाठी वापरली जाणार असून, महापालिकेला आर्थिक भुदंड बसणार नाही, अहमदाबादमध्ये ट्रान्सस्टेडिया कंपनीने व्यवसायातील आघाडीच्या कंपन्यांशी क्रीडा भागीदारी केली आहे. त्यामुळे यशवंत स्टेडियम व चिटणीस पार्कसाठी हाच उपाय केला जाण्याची शक्यता मनपाच्या प्रकल्प विभागातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Nagpur
Good News : ‘स्वप्ननिकेतन’ घरकुल प्रकल्पाकरीता नोंदणी सुरू

विशेष म्हणजे यापूर्वीही महापालिकने यशवंत स्टेडियमच्या विकासाची योजना आखली होती. यावर 89 कोटी खर्च करून मैदानाचे आधुनिकीकरण, प्रशासकीय कक्ष, खेळाडूंसाठी वसतिगृहे, दुकाने व मुख्य रस्त्यावर एक शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रस्तावित होते. परंतु ही योजना कागदावरच राहीली. आता सल्लागाराला या दोन्ही स्टेडियमचा आराखडा तयार करण्यास परवानगी दिल्याने येत्या काळात शहरात अत्याधुनिक स्टेडियमची भर पडणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com