MIHAN : मिहानमध्ये जमीन घेऊनही 4 वर्षांपासून 'या' कंपनीची रखडपट्टी

MIHAN
MIHANTendernama

नागपूर (Nagpur) : जमीन घेऊन बांधकाम करीत नसलेल्या मिहानमध्ये (MIHAN) डझनभरापेक्षा अधिक कंपन्या आहेत. त्यामुळे त्यांचे मान्यता पत्रही रद्द करण्यात आले आहे. तर मागील चार वर्षांपासून मिहान सेझमध्ये जमीन घेतल्यानंतर बांधकाम करण्यास उत्सुक असलेली आयटी कंपनी जबाबदार एजन्सीमुळे बांधकाम करू शकत नसल्याची स्थिती आहे.

MIHAN
Nashik : 'रामसेतू'वर होणार धनुष्य पूल; तर तपोवनात लक्ष्मण झुला

मिळालेल्या माहितीनुसार, आयटी कंपनी क्लिक टू क्लाऊडने जवळपास चार वर्षांपूर्वी मिहान - सेझमध्ये 1.2 एकर जमीन घेतली होती. परंतु जवळपास वर्षभरापर्यंत लीज डीड होऊ शकली नाही. त्यानंतर जमिनीवर सिव्हेज पाईप पडलेले होते. ही जमीन विकसित होऊ शकली नाही. त्यानंतर कोरोना सुरू होऊन कंपनीचे काम रखडले.

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीचे माजी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यकाळात कंपनी आपले बांधकाम सुरू करू शकली नव्हती. आता या पदावरील अधिकारी बदलले आहेत. या सर्व अडचणी दरम्यान कंपनीने आयटी पार्कमध्ये जागा घेऊन आपले कामकाज सुरू केले होते. परंतु तेथे किराया अधिक असल्यामुळे कंपनीने मिहान सेझच्या सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंगमध्ये जागा घेतली. मात्र येथे सुद्धा क्लिक टू क्लाऊडला नियमित रुपाने जागा देण्यात आली नसल्याची माहिती आहे.

MIHAN
Nashik : सिंहस्थ प्रारुप आराखडा फुगून 8 वरून 11 हजार कोटींवर

समन्वयाचा अभाव

कंपनीला मान्यता पत्र मागण्यात येत आहे. कंपन्यांना प्रकल्प परिसरात जागा देण्यासाठी एसईझेडचे डीसी व एमएडीसी जबाबदार आहेत. हे दोघेही असताना कंपन्या व युनिटला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

युनिट होल्डरच्या समस्यांचा निपटारा करू, असे एमएडीसीच्या वतीने सांगण्यात येते. परंतु तसे होताना दिसत नाही. यासोबतच मिहान आणि सेझच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com