नागपुरातील 'या' मोठ्या प्रकल्पाला फडणवीस - गडकरी वादाचा फटका?

Fadnavis & Gadkari
Fadnavis & Gadkari

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेचा सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या ऑरेंज सिटी स्ट्रीटमधील मॉलच्या विकासाकरिता एजन्सी बदली तरी काहीच प्रगती झालेली नाही. भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे (Rift Between Fadnavis and Gadkari) एजन्सी बदलल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. (Orange City Street Project Nagpur)

Fadnavis & Gadkari
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाबाबत पालिका मोठ्या निर्णयाच्या तयारीत

शहराच्या पश्चिम भागात डिफेंसने आपली रेल्वे लाईन काढून घेतली. ती जागा २० वर्षांपूर्वी महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली. या जागेवर लंडन स्ट्रीट उभारण्याची घोषणा दहा वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. मात्र बजेटच्या पुस्तिकेत उल्लेखाशिवाय यापुढे महापालिकेने काहीच केले नाही. कट्टर हिंदुत्ववादी भाजपचे नेते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लंडन स्ट्रीटचे नाव बदलले आणि ऑरेंजसिटी स्ट्रीट ठेवले. मात्र नामांतरण करूनही भाग्य फळफळले नाही.

Fadnavis & Gadkari
एकाच पोलवर दिवे, इंटरनेट बूस्टर, सीसीटीव्ही, डिजिटल फलक आणि...

दरम्यान, गडकरी यांनी शापूरजी पालनजी या कंपनीला आर्किटेक म्हणून नेमले. संपूर्ण शहरातील बाजार या स्ट्रीट खाली आणला जाणार होता. मॉल, टॉवर तसेच भाजीपासून मटनाची विक्रीची व्यवस्था केली जाणार होती. मात्र शापूरजी पालनजी कंपनीने आखलेल्या कोट्यवधीच्या प्रकल्पाला कोणीच कंत्राटदार लाभला नाही. तुकडे करून वा टप्प्याटप्प्याने कामे देण्यास गडकरींचा नकार होता. कुठल्याही एकाच कंत्राटादामार्फत हा स्ट्रीट पूर्ण करावा आणि तो एकसमान असावा, असा त्यांचा आग्रह होता.

Fadnavis & Gadkari
PUNE:आधीच कोंडीत अडकलेल्या सिंहगड रोड वासियांना आता या कामामुळे...

कोणीच पुढे येत नसल्याने गडकरी यांनी मॉल उभारण्यासाठी महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला आंत्रित केले. त्यानुसार मेट्रो मॉलचे काम सुरू झाले. मात्र ते संथगतीने होत असल्याचा आरोप महापालिकेच्या सभेत झाला. भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी मेट्रोच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे महापालिकेने मेट्रोकडून काम कढून घेतले. स्वतःच मॉल उभारण्याचा निर्णय घेतला. महापालिकेचेही काम पुढे सरकले नाही.

Fadnavis & Gadkari
कोरोनाच्या लाटेत घोटाळ्याची भरती; मुदत संपलेल्या औषधांचे...

दटके हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. गडकरी यांच्या प्रकल्पाला त्यांनी विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. गडकरी यांनी आजवर यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र भाजपच्या अंतर्गत राजकारणात मेट्रो मॉलचा बळी जात आहे. मेट्रो रेल्वेला २०० कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र महापालिकेतर्फे वेळोवेळी निधी दिला जात नसल्याने मेट्रोने काम थांबवल्याचे कळते. अलीकडे गडकरी यांनी महापालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यासला कामे देण्याऐवजी महत्त्वाचे प्रकल्प मेट्रो रेल्वेकडून पूर्ण करून घेत आहेत. रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल पाडण्याचे कंत्राटही मेट्रो रेल्वेकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वे महापालिका, सुधार प्रन्यासप्रमाणे नोडल एजन्सी म्हणून काम करू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com