Devendra Fadnavis : आर्वीकरांना मोठे गिफ्ट; 368 एकरांत उभी राहणार औद्योगिक वसाहत

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

वर्धा (Wardha) : आर्वी ही ब्रिटिशांच्या काळापासून मोठी बाजारपेठ राहिली आहे. येथील कापसाला विदेशातही मोठी मागणी होती. परंतु कालौघात ही बाजारपेठेची ओळख पुसली गेली. या ठिकाणी औद्योगिकीकरणाला फारशी चालना मिळाली नसल्याने बेरोजगारीचीही समस्या भेडसावत आहे. यातूनच आर्वीत औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची मागणी रेटण्यात आली. अखेर आर्वी पुत्राच्या प्रयत्नाने घटस्थापनेच्या दिवशी आर्वीत औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास मान्यता दिली. त्यामुळे राज्य शासनाची ही आर्वीकरांना नवरात्रोत्सवाची भेट ठरली.

Devendra Fadnavis
Pune : म्हाळुंगे-माणसह 5 टीपी स्कीमबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय; तब्बल 800 कोटींचा

आर्वीतील उद्योगांना चालना मिळून बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे आणि ब्रिटिशकालीन आर्वीची ओळख पुन्हा निर्माण व्हावी म्हणून आर्वी कॉटन अँड जनर्स असोसिएशनने आर्वी पुत्र तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यसन अधिकारी सुमित वानखेडे यांच्याकडे एमआयडीसी स्थापन करण्याची मागणी लावून धरली. सुमित वानखेडे यांनी याकरिता यशस्वीरीत्या पाठपुरावा केल्याने अवघ्या 12 महिन्यांत आर्वी येथील औद्योगिक वसाहतीला मान्यता मिळाली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये अडेगाव, लाडणापूर व लहादेवी या क्षेत्रातील 67.89 हेक्टर औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आर्वीकरांनी राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या गावातील जमिनीवर एमआयडीसी : 

आर्वीतील औद्योगिक वसाहतीकरिता तालुक्यातील अडेगाव परिसरातील 9.91 हेक्टर, लाडणापूर परिसरातील 36.59 हेक्टर आणि लहादेवी परिसरातील 67.89 हेक्टर जमिनीचा समावेश आहे. ही जमीन आर्वी ते वर्धा या राज्य महामार्गालगत असल्याने यामुळे आता आर्वी ते वर्धा या महामार्गाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.

Devendra Fadnavis
Pune : नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी!

उपमुख्यमंत्र्यांची मोलाची साथ :

आर्वीमध्ये औद्योगिक वसाहत स्थापन करण्याकरिता उद्योजकांनी वानखेडे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश एमआयडीसीच्या सचिवांना दिले. राज्याच्या उद्योग विभागाने एक रेकॉर्ड तयार करून त्याला मान्यताही दिली.

या महत्त्वाच्या कामाकरिता फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग सचिव हर्षदीप कांबळे व एमआयडीचे मुख्याधिकारी विपीन शर्मा यांचे सहकार्य लाभल्याने वानखेडे यांनी सांगितले.

कॉटन अँड ऑईल इंडस्ट्रीज असोसिएशनने आर्वीत एमआयडीसी व्हावी, याकरिता निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन अवघ्या 12 महिन्यांत नव्याने एमआयडीसी स्थापित करण्याचा निर्णय घेऊन मान्यता मिळाली. ही आर्वीकरांसाठी नवरात्रोत्सवाची भेट ठरली आहे. आर्वी यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असल्याने एक आता आर्वीकर म्हणून मलाही मोठे समाधान मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com