Chandrapur : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला होणार 'या' निर्णयाचा फायदा; 7 कोटींची...

Chandrapur
ChandrapurTendernama

चंद्रपूर (Chandrapur) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णसंख्या वाढून आरोग्य सुविधांवर कमालीचा ताण असताना राज्य सरकारने 175 सुरक्षारक्षकांच्या भरतीचा निर्णय घेतला, यातून वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर, प्राध्यापक, परिचर्या संवर्ग, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या हाणामारीच्या घटनांना आळा बसेल, असा दावा केला जात आहे.

Chandrapur
Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वेसाठी Good News! अर्थसंकल्पात तब्बल 2424 कोटींचा...

चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 2017 पासून पहिली तुकडी सुरू झाली. 100 बेडच्या या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी टीबी रुग्णालय व महिला रुग्णालयाचे कॅम्पस उपलब्ध करून दिले. 650 खाटांच्या वैद्यकीय रुग्णालयासाठी जिल्हा रुग्णालयाची इमारत डीएमईआरकडे सुपूर्द केली. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची नवीन इमारत उभारण्यासाठी राज्य सरकारने बल्लारपूर बायपास रस्त्यावर 100 एकर जागा दिली.

या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृह व शासकीय निवासस्थान आदी बांधकामे सुरू आहेत. 1 लाख 32 हजार 103 चौरस मीटर 6 मजली रुग्णालयाचे बांधकाम, कधी निधीअभावी तर कधी बांधकाम कंपनीच्या दिरंगाईने नऊ वर्षांनंतरही पूर्ण झाले नाही. या 3 कंपनीला हे बांधकाम 2020 च्या अखेरीस पूर्ण करण्याची डेडलाईन होती. सध्याच्या जागेत आरोग्य सुविधांची कमरता असूनही काही डॉक्टर, परिचर्या संवर्ग, अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे आरोग्यसेवा देत आहेत.

Chandrapur
CIDCO : सिडकोचा डबलधमाका; 3322 सदनिकांच्या सोडतीची घोषणा; किंमतही 6 लाखांनी कमी

सुरक्षारक्षक किती व कुठे असणार?

हाणामारीच्या घटनांना पायबंद आणि संस्थेतील यंत्रसामुग्री, फर्निचर व इतर वस्तूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई यांच्याकडून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी 175 सुरक्षारक्षक बाह्यस्रोताकडून घेण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी सादर केला होता. या प्रस्तावाला सरकारने मंजुरी प्रदान केली.

वैद्यकीय महाविद्यालयात 35 व रुग्णालयात 140 सुरक्षारक्षक तैनात असतील. राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षारक्षक उपलब्ध करून घेण्यासाठी एकूण वार्षिक 7 कोटी 10 लाख 97 हजार 360 रुपयांच्या प्रस्तावाला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com