पतंजलीचे तारीख पे तारीख; जुलैचा मुहूर्त पुन्हा हुकला

Baba Ramdev
Baba RamdevTendernama

नागपूर (Nagpur) : मिहान प्रकल्पातील बाबा रामदेव यांच्या पतंजली मेगा फूडपार्कमधील फ्लोअर मिल जुलै महिन्यात सुरू करण्यात येईल असे सांगितले जात होते. मात्र, तब्बल पाचवा मुहूर्तही आता हुकला आहे. त्यामुळे पतंजलीचा प्रकल्प कधी सुरु होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Baba Ramdev
आयफेल टॉवरपेक्षाही जास्त उंच आहे भारतातील 'हा' पूल; लवकरच...

आशियातील सर्वात मोठा फूडपार्क मिहान प्रकल्पात सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा रामदेवबाबा यांनी केली होती. या प्रकल्पाला जमीन दिल्याच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले होते. या अडचणीत मार्ग काढत प्रकल्पाचे बांधकाम सुरु होते. यानंतर टाळेबंदी, कामगारांची अडचण आदीतून मार्ग काढत आता पतंजली प्रशासनाने पहिल्या टप्‍यात फ्लोअर मिल सुरु करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी हवी असलेली ११ केव्हीचे वीजेचा पुरवठा केला जात आहे. मार्च महिन्यांत प्रकल्प सुरु करा, असे निर्देश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) दिले होते. त्यावेळी वीजेचे सबस्टेशनचा मुद्दा पुढे करून मुदतवाढ घेतली आहे. एमएडीसीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांच्याशी यासंदर्भात संपर्क केला असता त्यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बोला असे सांगितले. मात्र, त्यांनी मोबाईलवर प्रतिसाद दिला नाही.

Baba Ramdev
'पतंजली'ला 15 मॅगावॅटचा 'झटका'! सबस्टेशनचा योग पुन्हा का चुकला?

मिहानमधील मेगा फूडपार्कच्या मागणीनुसार महावितरणाने ११ केव्हीची जोडणी करून दिलेली आहे. पतंजलीच्या व्यवस्थापनाने विद्युत पुरवठ्यासाठी सबस्टेशनची गरज आहे. त्यासाठी त्याचा महापारेषणकडे पाठ पुरावा केला. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. तसेच त्यासाठी दोन वर्ष थांबावे लागेल असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मुदत पाळण्यात अपयश
यापूर्वीही ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत प्रकल्प सुरु करण्यास सांगितले होते. मात्र, ही मुदत पाळण्यात पतंजलीला अपयश आल्यामुळे सलग दोनवेळा दत वाढवून देण्यात आली. त्यानंतरही अद्यापपावेतो हा प्रकल्प सुरू झालेला नाही. पतंजली प्रशासनाने आता जुलै महिन्यात फ्लोअर मिलचा प्रकल्प सुरू करण्याचे निश्चित केले होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com