Akola
AkolaTendernama

Akola : अकोला शहरातील घनकचऱ्यावर 20 कोटींचा खर्च; पण समस्या जैसे थे!

Published on

अकोला (Akola) : अकोला शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने भोड येथील 22 एकर जमिनीवर उभारलेल्या बायोगॅस प्रकल्पावर प्रशासनाने 20 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही कचऱ्याची समस्या जैसे थे आहे.

Akola
Winter Session : विधानभवनासमोरील इमारत संपादित करणार; विस्तारीकरणाच्या कामाला गती

शहरातील कचऱ्याची नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केली जात आहे. डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. या परिसरातील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती करणे, सेंद्रिय खताची निर्मिती करून इतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने 2020 मध्ये महापालिकेला 45 कोटींचा निधी वितरित केला.

या कामासाठी परभणी येथील कंत्राटदाराची नियुक्ती झाली. या ठिकाणी ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण करून सुमारे 20 टन ओल्या कचऱ्यापासून प्रतिदिन 1 हजार 500 युनिट वीज तयार केली जात आहे.

Akola
Nashik : शिंदे गटाची भाजपवर मात! नाशिकचे IT पार्क आता राजूर बहुल्यात

300 ट्रॉली शेण आणतात कुठून?

भोड येथील बायोगॅस प्रकल्पात दररोज किमान 300 ट्रॉली शेण आणले जाते. त्यापासून 1 हजार 500 युनिट वीज तयार होत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेण आणतात कुठून? या बदल्यात संबंधित पुरवठादाराला किती रुपये अदा केले जात आहेत, असे प्रश्न उपस्थित होत आहे,

देयक देण्याची घाई

नायगाव डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यासाठी जेसीबी व पोकलैंड मशीन किती? मनपाने कंत्राटदाराला 20 कोटी रुपये अदा केले असून, उर्वरित देयक अदा करण्यासाठी लगीनघाई सुरू आहे.

Tendernama
www.tendernama.com