Vidhan Bhavan
Vidhan BhavanTendernama

Prakash Abitkar: वांगणी रुग्णालयातील अप्रमाणित औषध खरेदीची विभागीय चौकशी

Published on

मुंबई (Mumbai): ठाणे जिल्ह्याच्या वांगणी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये बुरशी लागलेली औषधे आढळल्याप्रकरणी खरेदीशी संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचे निलंबन करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.

Vidhan Bhavan
Exclusive: काळ्या यादीतील कंपनीवर आरोग्य विभागाची मेहेरनजर

सदस्य मोहन मते यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य किसन कथोरे यांनी सहभाग घेतला.

मंत्री आबिटकर म्हणाले, वांगणी येथील रुग्णालयातील औषधांची खरेदी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्थानिक अधिकाऱ्यांनी केलेली आहे. १५ डिसेंबर २५ रोजी येथील औषधांचे नमुने घेण्यात येऊन शासकीय प्रयोगशाळांमधून त्याची तपासणी करण्यात आली. या औषधांमध्ये बुरशीजन्य संक्रमण आढळून आले नाही. तथापि इतर निकषांनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या यंत्रणेने हे औषध अप्रमाणित असल्याचे घोषित केले आहे.

Vidhan Bhavan
Exclusive: 'स्वच्छ महाराष्ट्र'च्या नावाखाली 12 हजार कोटींच्या निधीवर डल्ला; बायोमायनिंग बनले भ्रष्टाचाराचे कुरण!

या प्रकरणी औषधांना योग्य ठरविलेल्या प्रयोगशाळेला काळ्या यादीत टाकण्यात येईल. त्याचप्रमाणे खरेदीशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबन करण्यात येईल. यापुढे असे प्रकार घडू नयेत आणि गुणवत्तापूर्ण औषधे खरेदी केली जावीत यासाठी लवकरच ड्रग डिटेक्शन मशीनचा उपयोग केला जाईल असे त्यांनी सांगितले.

वांगणी येथील रुग्णालयाची दर्जोन्नती करण्यासंदर्भात सर्व निकषांचा आढावा घेऊन प्राधान्याने विचार केला जाईल, असेही आबिटकर यांनी यावेळी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Tendernama
www.tendernama.com