Nashik: देयके मिळत नसल्याने 'जलजीवन'च्या ठेकेदारांचे कामबंद आंदोलन सुरू

जलजीवन मिशन
Jal Jeevan MissionTendernama
Published on

नाशिक (Nashik) : जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना गेल्या दीड ते दोन वर्षापासून देयके देण्यासाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. यामुळे कामे करूनही ठेकेदारांनी कामे करूनही कामांची देयके मोठ्या प्रमाणावर थकीत राहिली आहेत. यामुळे ठेकेदारांनी आधी केलेल्या कामांची देयके मिळाल्याशिवाय पुढील कामे न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १५ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

जलजीवन मिशन
Nashik ZP Scam: नाशिक झेडपीत ₹6 कोटींचा सोलर घोटाळा?

राज्य पाणी पुरवठा ठेकेदार संघटनेमार्फत शासनाकडे वारंवार निवेदने देऊनही, जल जीवन निशनमधील अडचणी व कंत्राटदाराच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही. यामुळे कंत्राटदारांनी पाणी पुरवठा योजनांची सर्व कामे पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कंत्राटदारांच्या मागण्या पुढीलप्रमाणे...

  • जलजीवन मिशनच्या कामांना निधी उपलब्ध करून प्रलंबित देयेके १०० टक्के देण्यात यावीत.

  • निधीअभावी देयेके मिळल्यास विलंब झाल्याने धकीत देयके रक्कम व्याजा संहित देण्यात यावी.

  • निधीअभावी अर्धवट किंवा रखडलेल्या सर्व कामांना केंद्र शासनाच्या धोरणा प्रमाणे मार्च २०२८ पर्यंत विनादंड मुदतवाढ देण्यात यावी.

  • निधी अभावी योजनांच्या विलंबासाठी कंत्राटदारांना जबाबदार धरून करण्यात आलेली दंडात्मक कारवाई रद्द करावी व कपात केलेली रक्कम तात्काळ परत करण्यात यावी.

जलजीवन मिशन
Nashik ZP: जिल्हा परिषदा केवळ अत्यावश्यक कामांचीच देयके देणार, कारण काय?
  • निधीअभावी रखडलेल्या सर्व योजनांना सुधारित दराने मंजुरी देण्यात यावी. सुधारित अंदाजपत्रके महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दरसूची व नियमावली प्रमाणे विहित वेळेत मंजूर करण्यात यावीत.

  • टेंडर प्रक्रियेत लोकवर्गणीचा कोणताही उल्लेख नसताना, कंत्राटदारांच्या बिलातून एकतर्फी कपात केलेली लोकवर्गणीची रक्कम तात्काळ परत करण्यात यावी या पुढे लोकवर्गणी ची रक्कम कंत्राट दाराच्या बिलातून कपात करण्यात येऊ नये.

  • निधीअभावी कामे रखडलेल्या योजनांची कामे पुढे चालू ठेवण्यासाठी कामाच्या सुरक्षाठेवी पोटी प्रारंभी भरणा करण्यात आलेली सुरक्षा अनामत रक्कम, अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम व इसारा रक्कम तसेच बिलातून कपात करण्यात आलेली सुरक्षा अनामत रक्कम या रकमा कंत्राटदारास तत्काळ परत करण्यात यावी.  निधीची उपलब्धता झाल्यानंतर कामाच्या अंतिम बिलामधून या रकमा परत कापून घेण्यात याव्यात.

  • बऱ्याच योजनांना निधीची उपलब्धता नसल्यामुळे या योजनाची कामे ठप्प झालेले आहेत. त्यास कंत्राटदार जबाबदार नसल्याने आतापर्यंत झालेल्या कामाचे बिल अंतिम करून द्यावे, त्या कामाचे पुढील देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राट दारावर राहणार नाही.

  • या कामांसाठी काढण्यात आलेला विमा हा योजनेचे कामे संपेपर्यंत ग्राह्य धरण्यात यावा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com