Pune: वडगाव शेरीच्या ७/१२ उताऱ्यांबाबत भूमी-अभिलेखचा मोठा निर्णय..

Wadgaon Sheri
Wadgaon SheriTendernama
Published on

पुणे (Pune) : ईटीएस मशीन (ETS Machine) आणि रोव्हर (Rover) तंत्रज्ञानाद्वारे वडगाव शेरीतील (Vadgaon Sheri) ८ चौरस किलोमीटरमधील मिळकत मोजणी भूमी अभिलेख (Land Records) विभागाकडून पूर्ण करण्यात आली. मात्र, या मोहिमेत २२ हजारांपैकी ३ हजार ९८९ मिळकतींची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे या मिळकतीचे सातबारा उतारे पुन्हा सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी-अभिलेख विभागाने घेतला आहे.

Wadgaon Sheri
Davos : महाराष्ट्र उद्योजकांच्या पसंतीस; 1 लाख 37000 कोटींचे करार

भूमि अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली गेली आहे. त्यानुसार वडगाव शेरीतील सातबारा उतारे मे महिन्यापासून बंद करण्यात आले होते. मात्र, विशेष मोहिमेतंर्गत भूमि अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने वडगाव शेरीतील जीएआयएस मॅपिंगद्वारे प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला.

Wadgaon Sheri
Nashik ZP : जलजीवनच्या योजनांचे हस्तांतरण आता सरपंचांऐवजी...

मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंदाजे २२ हजार मिळकती असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी ७ हजार ८११ मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड यापूर्वी नगर भुमापनाद्वारे उघडण्यात आले असल्याचे दिसले. त्यानंतर उर्वरीत मिळकतींच्या प्रत्यक्ष तपासणीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये मूळ सर्वेक्षण झालेल्या ७ हजार ८११ मिळकती वगळता २ हजार ७४० मिळकतीची गुंठेवारी आदेशाप्रमाणे नवीन मिळकतपत्रिका उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

तर ३ हजार ९८९ मिळकतीचे बिनशेती आदेश किंवा इतर कोणतीही कागदपत्रे प्राप्त झाली नाहीत. त्यामुळे या मिळकतींचे बंद केलेले सातबारा उतारे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता वडगाव शेरीतील सुमारे ११ हजार मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच त्या सर्व मिळकतीचे जीआय बेस नकाशे या विभागाकडून तयार करण्यात येणार आहेत.

Wadgaon Sheri
Public transport पुणेकरांची अवस्था 'एक ना धड भाराभर..!' कारण...

वडगाव शेरीतील सातबारा उतारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार ही मोहिम पूर्ण करण्यात आली असून कागदपत्रे उपलब्ध झालेल्या सर्व मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- अनिल माने, उपसंचालक, भूमी अभिलेख

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com