'म्हाडा' लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांना मिळणार 'ही' सवलत

MHADA Pune
MHADA PuneTendernama

पुणे (Pune) : गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांची सोडत गतिमान आणि पारदर्शी पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) इंटिग्रेटेड लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम (आयएलएमएस) २.० या नवीन तंत्रज्ञान प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला. परंतु, दोन दिवसांत या प्रणालीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे नवीन राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अर्ज करताना जुने अधिवास प्रमाणपत्र संगणकीकृत करण्याची मुभा दिली आहे. तसेच इतर कागदपत्रांच्या पडताळणीबाबत संबंधित विभागीय यंत्रणांनादेखील कळविले आहे, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.

MHADA Pune
जानेवारी आलातरी ऑक्टोबरचा पगार मिळेना; सुरक्षारक्षकांना वाली नाही?

गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांची विक्री, अर्ज करण्यापासून ते सदनिकेचा ताबा मिळेपर्यंतची प्रक्रिया ‘आयएलएमएस २.०’ या नूतन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यासाठी ही प्रणाली नव्याने विकसित करण्यात आली. तसेच ही प्रणाली विकसित करताना कमीत कमी कागदपत्रे भरण्याची सुविधादेखील निर्माण केली. त्यामुळे नवीन प्रणालीनुसार अर्जदारांना अर्ज भरताना छायाचित्र, ई-स्वाक्षरी, शपथपत्र, राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र, स्वीकृतीपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार-पॅनकार्ड आदी सात कागदपत्रे आज्ञावलीनुसार संगणकीकृत केल्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याचे निकष टाकण्यात आले. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची आज्ञावली निश्‍चित करण्यात आली. परंतु, ज्या नागरिकांनी जुन्या काळात अधिवास प्रमाणपत्र किंवा पॅनकार्ड काढले, त्यांना अर्ज भरताना अडचणी येऊ लागल्या आहेत. तशा तक्रारी म्हाडाकडे आल्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी म्हाडाचे अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अभियंत्यांची नुकतीच एक बैठक झाली, असे आयएलएमएस प्रणाली तयार करणारे अभियंते जितेंद्र जोशी यांनी सांगितले.

MHADA Pune
नवी मुंबई मेट्रोची प्रतीक्षा संपली; मोदी यांच्या हस्ते फुटणार नारळ

जोशी म्हणाले, आयएलएमएस २.० या प्रणालीनुसार इच्छुक अर्जदारांची दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केंद्र व राज्य सरकारच्या विभागाकडून केली जाते. उदा. आधार क्रमांकाची पडताळणी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (यूआयडीएआय) डीजी लॉकरवरून, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) यूटीआयच्या डेटा बेसवर, तर पॅनकार्ड यूटीआयच्या डेटाबेस अशा वेगवेगळ्या विभागांच्या डेटा बेसवरून पडताळणी होत आहे. तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यास विलंब होत आहे. त्या वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

MHADA Pune
अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने नव्या कोऱ्या 15 इलेक्ट्रिक बसेस पडून

नवीन अधिवास प्रमाणपत्रावर बारकोड असून या पद्धतीची संगणकीय आज्ञावली तयार केली आहे. अनेक नागरिकांचे जुने अधिवास प्रमाणपत्र असून या प्रणालीत पडताळले जात नसल्याने अर्ज प्रक्रिया रखडत होती. त्यामुळे जुने अधिवास प्रमाणपत्राची आज्ञावलीतील सूचना रद्द केली. परिणामी जुने अधिवास प्रमाणपत्र संगणकीकृत करणाऱ्यांना नवीन अधिवास प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज भरल्यानंतर महाआयटीकडून देण्यात येणारा युनिक क्रमांक नमूद करावा लागणार आहे. अन्यथा अर्ज प्रक्रिया पुढे जाणार नाही.
- जितेंद्र जोशी, अभियंता, आयएलएमएस २.० प्रणाली

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com