डोकेदुखी संपली; पुणे विमानतळाकडे जाणारा 'हा' रस्ता होणार चकाचक

Pune Airport
Pune AirportTendernama

पुणे (Pune) : तुम्ही जर विश्रांतवाडीमार्गे विमानतळाकडे (Vishrantwadi To Pune Airport Road) गेला असाल तर या रस्त्यावर किती खड्डे आहेत याचा अनुभव घेतलाच असेल. विमानतळाकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्याबाबत महापालिकेने (PMC) आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांची मागणी मान्य करत हा रस्ता चकाचक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Airport
फडणवीसांना बीएमसीकडून भेट; 22 कोटी खर्चून 'सागर'समोरील रस्त्याचे..

विश्रांतवाडीकडून विमानतळाकडे जाणारा संपूर्ण रस्ता आता सिमेंट कॉंक्रिटचा होणार आहे. या रस्त्यासह वडगाव शेरी मतदारसंघातील रस्त्यांच्या ४२ कोटींच्या कामांना पुणे महापालिकेच्या इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पावसाळ्यात विश्रांतवाडीकडून ५०९ चौक मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रेटचा करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.

Pune Airport
दादा भुसेंना हे शोभते का? 78 कोटींची स्थगिती उठवणार कधी?

त्याची दखल घेऊन आयुक्तांनी वडगाव शेरी मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी ४२ कोटींच्या आराखड्यास नुकतीच इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यात प्रामुख्याने विश्रांतवाडी टिंगरेनगर मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन हा संपूर्ण रस्ता आता सिमेंट काँक्रेटचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या रस्त्याच्या कामासाठी १९ कोटींचा खर्च येणार आहे,असे आमदार टिंगरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com