Pune : वा रे कारभार! अवघ्या 3 महिन्यांतच उखडला 'हा' रस्ता

PWD
PWDTendernama
Published on

पुणे (Pune) : डांबरीकरण पूर्ण होऊन केवळ तीनच महिने झालेले असताना खानापूर-पाबे रस्ता पाबे फाटा ते थोपटेवाडी या दरम्यान जागोजागी उखडला आहे. रस्त्याच्या कामाच्या नावाखाली अनेक महिने स्थानिकांसह नोकरदारांची झालेली गैरसोय रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा नशिबी आल्याने संताप व्यक्त होत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी परस्परविरोधी आणि उडवाउडवीची उत्तरे देताना दिसत आहेत.

PWD
Nashik : 56 कोटींच्या रेल्वे चाक निर्मिती कारखान्याची यशस्वी चाचणी

तब्बल पाच वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खानापूर ते वेल्हे तालुक्यातील पाबे या दरम्यानच्या सुमारे 34 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. अद्यापही पाबे घाटातील डांबरीकरण अपूर्ण असून ज्या ठिकाणी काम झालेले आहे त्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. पाबे फाटा ते थोपटेवाडी या दरम्यान तीन महिन्यांपूर्वी जून महिन्याच्या अखेरीस डांबरीकरण करण्यात आले होते. अवघ्या तीनच महिन्यांत हे डांबरीकरण जागोजागी उखडले असून खड्डे पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच डांबरीकरण उखडल्याने रस्त्यावर खडी पसरली असून त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. रस्त्याची सध्याची अवस्था पाहिली तर रस्ता नवीन केलेला आहे असे कोणीही म्हणणार नाही. वळणावर असलेले बिनकठड्याचे पूलही अत्यंत धोकादायक आहेत, असे मत नाव न सांगण्याच्या अटीवर शासकीय कर्मचाऱ्याने केली.

PWD
Nagpur : नागपूर शहरापासून 80 किमीवर उभे राहतेय एक नवे आश्चर्य! लवकरच उद्घाटन

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘‘या ठिकाणी डीबीएम झालेले असून बीएम बाकी असल्याने खड्डे पडल्याचे व खडीवर आल्याचे दिसत आहे,’’ असे सांगण्यात आले. तर अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर यांनी या ठिकाणी बीएम झालेले असून योग्य उताराने पाणी न वाहिल्याने खड्डे पडले असावेत, ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे तेथे संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा दुरुस्तीचे काम करून घेतले जाईल, अशी माहिती देण्यात आली.

पुलांना कठडेच नाहीत

या रस्त्यावर बापूजीबुवा मंदिर व इतर दोन ते तीन ठिकाणी जे पूल बांधण्यात आले आहेत. त्या पुलांना संरक्षक कठडेच करण्यात आलेले नाहीत. पुलाचा कठडा आणि रस्ता समतल असल्याने वाहन चालकांना अंदाज न आल्यास अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचीही मागणी नागरिक करत आहेत.

PWD
मंत्री विखेंची मोठी घोषणा; नगरमध्ये 'या' 2 ठिकाणी होणार MIDC

अनेक वर्ष खराब रस्त्यामुळे आम्ही हाल सहन केले. आता रस्ता झाल्याने गैरसोय दूर होईल असे वाटले होते. परंतु, तीनच महिन्यांत डांबरीकरण जागोजागी उखडले आहे. कामाचा दर्जा अत्यंत खराब आहे. यावर्षी मोठा पाऊस झालेला नाही तरीही रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

- सत्यवान नवघणे, सरपंच, खामगाव मावळ

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com