Hinjawadi IT Park Traffic
Hinjawadi IT Park TrafficTendernama

Pune : जागतिक दर्जाच्या आयटी पार्कला वाहतूक कोंडीचा विळखा? जबाबदार कोण?

Published on

पुणे (Pune) : जागतिक दर्जाचा हिंजवडीतील आयटी पार्क प्रशस्त रस्त्यांअभावी वाहतूक कोंडीत सापडला आहे.

Hinjawadi IT Park Traffic
Devendra Fadnavis : बांधकाम कामगारांना गणपती पावला; आता मिळणार 1 लाखाचे अनुदान

याला कारण म्हणजे एमआयडीसी, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील समन्वयाचा अभाव, अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा व चालढकल वृत्ती. या संस्था गेल्या २५ वर्षांत ‘आयटी’ला जोडणाऱ्या रस्त्यांचे भक्कम जाळे निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरल्याने हिंजवडीची पुरती कोंडी झाली आहे.

एमआयडीसी, पीएमआरडीए, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्रित येऊन पर्यायी रस्त्यांचे जाळे निर्माण केल्यास येथील वाहतूक समस्या सुटेल, असे मत स्थानिकांनी नोंदवले.

Hinjawadi IT Park Traffic
Pune : पूर्व भागातील रिंगरोड अखेर लागणार मार्गी; MSRDCकडे काम गेल्याने आता...

हे रस्ते होणे अत्यावश्‍यक

- हिंजवडी-माण-म्हाळुंगे या नवीन सहापदरी रस्त्याचे रखडलेले काम गरजेचे

- राधा चौक ते म्हाळुंगे- चांदे-नांदे रस्ता रुंदीकरण

- मुंबई बंगळूर महामार्ग ते वाकडकर वस्तीमार्गे हिंजवडी अपूर्ण रस्त्याचे काम

- विप्रो सर्कल, फेज २-मारुंजी-मुंबई बंगळूर महामार्गापर्यंतच्या रस्त्याला गती मिळावी

- सूर्या हॉस्पिटल - हिंजवडी फेज १ रस्त्याचे रखडलेले काम

- पांडवनगर-बापूजी बुवा मंदिर, सूस-हिंजवडी यांना जोडणारा रस्ता

- हिंजवडी गावठाण-शिवाजी महाराज चौकातून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण

- माण-हिंजवडी, माण-चांदे व नांदे-माण रस्त्यांचे काम

- पुनावळे काटे वस्ती ते मारुंजीला जाणारा रस्ता

- काटे वस्ती ते ताथवडे १८ मीटर रुंद रस्ता प्रस्तावित

- ताथवडे समाधान हॉटेल ते पुनावळेतील जुडीओ मॉल रस्ता

- हिंजवडी मेझा ९ चौक ते लक्ष्मी चौक रुंदीकरण

- लक्ष्मी चौक ते मारुंजी रस्त्याचे काम

Hinjawadi IT Park Traffic
Eknath Shinde : नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. फेज १ ते ३ पर्यंत रुंदीकरण करून त्यावर चार पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर हा प्रकल्प उभारणे, शिवाजी चौक ते स्मशानभूमी सहापदरी रस्ता, सूस ऑडी शोरूम ते गोदरेज सर्कल रस्ता या रस्त्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही निधी मिळणार आहे.

- एस. एस. भिंगारदिवे उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सूर्या हॉस्पिटल ते हिंजवडी फेज १ कडे जाणारा रस्ता आम्ही करणार आहोत. या रस्त्यातील बाधित शेतकऱ्यांसोबत सकारात्मक बोलणी न झाल्याने भूसंपादन रखडले आहे. त्यामुळे टेंडर प्रक्रिया राबवता आली नाही.

- देवाण्णा गट्टवार, कार्यकारी अभियंता, ड प्रभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

हिंजवडीला सूस रस्‍त्याशी जोडणारा रस्ता यांना जोडणारा तीन किलोमीटरचा समांतर रस्ता आम्ही करतो आहे. रस्त्यात येणाऱ्या जागेचे भूसंपादन रखडल्याने काम ठप्प आहे.

- अमर शिंदे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका

‘पीएमआरडीए, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी प्रशासनास पर्यायी रस्ते व खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक रस्त्यांची डागडुजी देखील ग्रामपंचायतीने केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची टाळाटाळ व बेजबाबदारपणा येथीस कोंडीला कारणीभूत आहे.

- गणेश जांभूळकर, सरपंच, हिंजवडी

Hinjawadi IT Park Traffic
Satara : सातारा, सांगली अन् मिरजकरांना रेल्वेकडून नव्या गाडीचे Gift!

आयटीतील वाहतूक कोंडीच्या दृष्टीने आमच्याकडेही तक्रारी आल्या आहेत. आम्ही त्यावर अनेक प्रस्ताव तयार केले आहेत. मात्र, प्राधिकरणाच्या बैठकीसमोर हे विषय मांडले जातील, त्यावर चर्चा होईल. त्या व्यतिरिक्त अंदाजपत्रकाला देखील हे विषय घेतले आहेत, त्याला मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही केली जाईल.

- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त पीएमआरडीए

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी पोलिसांनी एकेरी वाहतूक केली, तरीही हा प्रश्‍न सुटला नाही. म्हाळुंगे-हिंजवडी रस्त्यावरील पुलाचे काम व बापूजी बुवा मंदिर चौक ते चांदे-नांदेकडे जाणाऱ्या रस्त्याचेही मार्गी लावले आहे. रस्त्यांसोबतच मेट्रो व ‘पीएमपीएमएल’सारखी सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा सुधारणे व सक्षम होणे गरजेचे आहे. अन्यथा वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही.

- संग्राम थोपटे, आमदार, भोर- वेल्हे-मुळशी मतदारसंघ

Tendernama
www.tendernama.com