Pune : 33 मिसिंग लिंकची कामे पूर्ण झाल्यास शहरातील कोंडी फूटणार का?

pune city
pune cityTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आणि नवीन पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी महापालिकेकडून अर्धवट रस्त्यांची (मिसिंग लिंक - Missing Link) कामे करण्यावर यंदा अधिक भर दिला जाणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील ३३ मिसिंग लिंक रस्ते विकसित केले जाणार आहेत.

pune city
काळू धरण लवकरच पूर्ण करणार, रिमोल्डिंग प्रकल्पासाठी 240 कोटींची तरतूद : एकनाथ शिंदे

शहराच्या वेगवेगळ्या भागांत महापालिकेकडून विकास आराखड्यातील रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र या रस्त्यांना जोडणारे रस्ते अपूर्ण तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित आहेत. संबंधित रस्ते तयार नसल्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून ये-जा करावी लागते.

अशा अपूर्ण रस्त्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मागील महिन्यात मानवी साखळी करून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन हा प्रश्‍न सोडविण्यास सांगितले होते. तसेच राज्य सरकारकडून निधी देण्यासाठी पुढाकार घेण्याचेही आश्‍वासन दिले होते.

pune city
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन ‘बेकायदेशीर’; 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार भरपाई

दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मिसिंग लिंकच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. विकास आराखड्यातील रस्त्यांजवळील ३३ मिसिंग लिंक रस्ते विकसित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यामध्ये अस्तित्वातील विकास आराखड्यातील रस्त्यांना जोडणारे मिसिंग लिंक विकसित करून एक मध्यवर्ती वर्तुळाकार मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्याद्वारे पर्यायी वाहतुकीसाठी ३० मिसिंग लिंक विकसित करण्यात येणार आहेत. ३ मिसिंग लिंक यापूर्वीच महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी देखील तडजोडीने जागा ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा घेऊन टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com