Pune: कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांना खरेच 'अच्छे दिन' येणार की...?

Pune City
Pune CityTendernama

पुणे (Pune) : ब्रिटीशकालीन घरामध्ये राहणाऱ्या विजयचे कुटुंब वाढले, परंतु कॅन्टोन्मेंटच्या जाचक अटींमुळे त्याला घर बांधण्यास मर्यादा आल्या. आता कॅन्टोन्मेंट महापालिकेत जाणार असल्याची चर्चा ऐकून ‘महापालिकेत गेल्यावर आम्हाला सगळ्या योजनांचा फायदा मिळेल का? की पुन्हा सध्याच्याच जाचक अटी सांगून विकासापासून वंचित ठेवले जाईल’ असा प्रश्‍न त्याने उपस्थित केला.

याच पद्धतीने खडकी, पुणे कॅन्टोन्मेंटमधील रहिवाशांमध्ये महापालिकेत जाण्याची उत्सुकता असली, तरीही त्यांच्या मनामध्ये साशंकता असल्याची सद्यस्थिती आहे.

Pune City
Ratnagiri : 'जलजीवन मिशन'चे होणार थर्ड पार्टी ऑडिट

कॅन्टोन्मेंटमध्ये चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) कमी असल्याने रहिवाशांना घरबांधणी, दुरुस्तीमध्ये येणाऱ्या अडचणी, भाडेकरार नुतनीकरणासह विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. नूतनीकरण परवानगीसाठीचे अर्ज कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे वर्षानुवर्षे धुळखात पडून असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यातच अनधिकृत बांधकाम, झोपडपट्टीधारकांचे कॅन्टोन्मेंटच्या मतदारयादीतून नावे वगळण्यात आली. परिणामी, नागरिकांकडून महापालिकेत जाण्याविषयी प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होता.

दरम्यान, काही महिन्यांपुर्वी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार खडकी व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरणाबाबतच्या माहितीचा अहवाल राज्य शासनानने महापालिकेकडून मागविला होता. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डबाबतची आवश्‍यक माहिती राज्य सरकारकडे दिली, त्यानंतर पुढे अद्याप काही हालचाल नसल्याची सद्यस्थिती आहे.

Pune City
Pune: सिंहगड रोडवासियांनो कधी थांबणार तुमचा जीवघेणा प्रवास?

कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांपुढील अडचणी
- एफएसआय कमी असल्याने बांधकामावर मर्यादा
- घरदुरुस्ती, घरबांधणी, भाडेकरार नुतनीकरणास येणाऱ्या अडचणी
- राज्य सरकारच्या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ
- कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आर्थिक स्थिती नाजूक असल्याने विकास कामांवर निर्बंध

कॅन्टोन्मेंट महापालिकेत गेल्यामुळे होणारे फायदे
- कामांमध्ये सुसूत्रता येऊन कामे वेळेत पूर्ण होण्याची शाश्‍वती
- राज्य सरकार, महापालिकेच्या योजनांचा मिळणारा लाभ
- आरोग्य, शैक्षणिक सुविधांचा मिळणारा फायदा
- मालमत्ता आराखड्याची कामे गतीने होण्याची शक्‍यता

Pune City
Devendra Fadnavis साहेब, पुणेकरांना आनंदाची बातमी कधी देणार?

कागदपत्रे व नियमांच्या नावाखाली नागरिकांचे प्रश्‍न प्रलंबित राहतात. त्यामुळे कॅन्टोन्मेंट महापालिकेत आल्यास नागरिकांच्या समस्या सुटतील. नागरिकांना विविध योजनांचा फायदा होईल.
- डॉ. किरण मंत्री, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड

कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांकडूनच महापालिकेमध्ये जाण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, आता चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.
- अतुल गायकवाड, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड

एफएसआय, घरबांधणीसाठी परवानगी, महापालिका व राज्याच्या योजनांचा नागरिकांना फायदा होईल. परंतु, सुविधा न देता, कॅन्टोन्मेंटमधील रहिवाशांना लष्काराच्या सुरक्षिततेच्या नावाखाली ठराविक निर्बंध घालून केवळ कर वसूल करण्यासाठी महापालिकेत घेतले जाणार असेल, तर त्याद्वारे नागरिकांची फसवणूक होईल.
- मनीष आनंद, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांच्या मालमत्तांबाबत असंख्य अडचणी आहेत. घरमालक-भाडेकरू वाद आहेत. हे प्रश्‍न महापालिकेत सुटू शकतात.
- कमलेश चासकर, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com