Pune : आता तरी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपघात थांबणार का?

chandrakant patil
chandrakant patilTendernama

पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या (Katraj - Kondhva Road) रुंदीकरणासाठी जागा ताब्यात आली तर मार्चपर्यंत काम पूर्ण होऊ शकते. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून, जागा मोजणी व इतर प्रक्रिया करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे. या रस्त्यावर वाहतूक सुधारणा करून अपघात थांबविण्यासाठी १७५ वॉर्डन नियुक्त केले जातील. रस्त्यात येणारे बसथांबे, विजेचे खांब स्थलांतरित करावेत आणि उतारावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलरचे पट्टे मारावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

chandrakant patil
Nashik : भुसे की भुजबळ? यात अडकले झेडपीचे नियोजन

पावसाळ्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले, त्यामुळे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले, तर काही जणांना जीवही गमवावा लागला. त्यामुळे महापालिकेच्या कामावर टीका केली जात असताना गेल्या महिनाभरात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागा पाहणी करत सुधारणा सुचविल्या आहेत. या रस्त्याच्या कामाला गती यावी, यासाठी सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कात्रज ते खडी मशीन चौक या ३.५ किलोमीटर रस्त्याची पाहणी केली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेवक प्रकाश कदम आदी या वेळी उपस्थित होते.

जड वाहनांसाठी तात्पुरता रस्ता

खडी मशीन चौकाकडून कात्रजच्या दिशेने जाताना खासगी मालकाची मोकळी जागा आहे. ही जागा ताब्यात घेतानाच तात्पुरता १५ मीटरचा रस्ता करून त्यावरून जड वाहतूक वळवता येऊ शकते. त्यामुळे कोंढव्यातील स्मशानभूमी व अरुंद रस्ता असलेल्या भागातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर हा रस्ता एका महिन्यात पूर्ण करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी सूचना पाटील यांनी केली, तसेच दर महिन्याला या प्रकल्पाचा आढावा घेऊ, असे ही पाटील यांनी सांगितले.

chandrakant patil
धक्कादायक! संगनमताने 300 कोटींची कामे मिळाली नेत्यांच्या जवळच्या ठेकेदारांना

अपघात टाळण्यासाठी वॉर्डन

कात्रज-कोंढवा रस्त्यावर महापालिकेचे १००, वाहतूक पोलिसांचे ५० आणि ‘सीएसआर’मधून २५ असे एकूण १७५ वॉर्डन लगेच नियुक्त केले जातील. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यास मदत होईल, अपघातप्रवण क्षेत्रात मार्गदर्शन केल्यास अपघात होणार नाहीत, तसेच वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलरचे पट्टे मारण्याच्या सूचना केल्या आहेत.

पालकमंत्री येणार म्हणून स्‍वच्छता

कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्याने या रस्त्याची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, आज हा संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात आला. आवश्‍यक त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले, मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेने वाढलेले गवत, कचरा उचलण्यात आला असल्याचे निदर्शनास आले.

chandrakant patil
Pune : पुणेकरांचा प्रवास झाला वेगवान; पीएमपीने सुरू केली विनावाहक-विनाथांबा सेवा

अशी आहे स्थिती

- महापालिकेतर्फे कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे २०१८ भूमिपूजन

- अद्याप केवळ ३३ टक्के काम पूर्ण

- रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात देण्यासाठी जागामालकांकडून रोख रकमेची मागणी

- एवढा मोठा निधी उपलब्ध नसल्याने सध्या ८४ मीटरऐवजी ५० मीटर रस्ता रुंद करण्याचा निर्णय

- त्यासाठी भूसंपादनालाही तब्बल २८० कोटी रुपये लागणार

- त्यातील २०० कोटी रुपये राज्य सरकार देणार असल्याचे जाहीर

- पण अद्याप हे पैसे महापालिकेला वर्ग झालेले नाहीत

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com