Pune : पुणेकरांना यंदापासून पाणी बिलही भरावे लागणार का?

PMC Budget : पाणी मीटर बसविण्याची जबाबदारी संबंधित ग्राहकांचीच असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.
Water
WaterTendernama
Published on

पुणे (Pune) : महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये करवाढ न करता पुणेकरांना एकीकडे दिलासा दिला असला तरी यंदाच्या आर्थिक वर्षांपासून मीटरप्रमाणे पाणी वापराचे बिल भरण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता वीज बिलांप्रमाणेच पाण्याचे बिलही भरावे लागणार आहे.

Water
शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याची चौकशी होणार; पुरवठादार जबाबदार असेल तर...

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी तब्बल १२ हजार ६१८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून त्यास मंजुरी दिली. त्यावेळी त्यांनी करवाढीसंदर्भात कोणताही प्रस्ताव नसल्याचे आणि हे अंदाजपत्रक सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. या अंदाजपत्रकामध्ये पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा व आरोग्य सेवेसाठी मोठी तरतूद केल्याचेही सांगितले. त्यामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळण्याची चिन्हे होती.

दरम्यान, आयुक्तांनी समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या सद्यःस्थितीची माहिती देऊन पाणी मीटर प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. मीटरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे दरवर्षी अंदाजे १२५ कोटी रुपये जमा होतात. २०२३-२४ या आर्थिक वर्षात १३० कोटी ९८ लाख रुपये, तर २०२४-२५ मध्ये ३१ जानेवारी अखेरपर्यंत १०२ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले आहेत.

३१ जानेवारी अखेरपर्यंत शहरात ४७ हजार ७० इतके नळजोडणीची संख्या आहे. तर ७२७ कोटी ९६ लाख रुपये थकबाकी आहे. दुबार पाणीपट्टी, नादुरुस्त मीटर, नळजोड बंद, घोषित झोपडपट्टीमधील पाणीपट्टी अशा विविध कारणांमुळे मीटर पाणीपट्टीची थकबाकी आहे.

Water
बार्शी-कुर्डुवाडी रस्ता ठरतोय अपघाताला आमंत्रण; दोन महिन्यांपासून रखडले काम, ठेकेदार गायब

पाणी मीटर बसविण्याची जबाबदारी संबंधित ग्राहकांचीच असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. नादुरुस्तीच्या काळात सरासरी वापरापेक्षा जादा वापर गृहीत धरुन बिल आकारणी केली जाते. मीटर दुरुस्त केल्यानंतर वसूल होणारी रक्कम ही २० ते २५ टक्के इतकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याचे काम महापालिकेकडून सुरू असल्याचे अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आले.

पाणीपट्टी थकबाकी वसुलीवर भर

नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रयत्न सुरू आहे. महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षांत तीन वेळा लोक अदालत भरविले. त्याद्वारे एक कोटी १३ लाख रुपये इतकी थकबाकी वसूल करण्यात आल्याचे महापालिकेने अंदाजपत्रकात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com